निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

पवार साहेबांची निरवा निरव ,,,,!अनेकांची जिरवा जिरव,,,,,,!


••••••••••••••••••••••••••••••••••••
ऍड अविनाश टी काले , अकलूज
9960178213
••••••••••••••••••••••••••••••••••••
माणसाचे वय हा असा फॅक्टर असतो की , त्या वयात पोहचले की आपल्या पुढील पिढ्यांचे व्यवस्थापन केलेच जाते ,
सामान्य माणसे त्यांच्या जमीन जुमला , संपत्ती , दाग दागिने , भांडी इत्यादी चे समान वाटप आपल्या वारस दारात करून देतात ,
राजकारणी घराणी आपल्या पुढच्या पिढ्यांना राजकारणात आणतात , त्यांना प्रशिक्षण देतात आणि त्यांच्या सत्तेचा वारसा हातात सोपवून निवृत्त होतात ,
माढा तालुक्यात आ बबन दादा शिंदे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत रणजित भैय्या शिंदे यांना निवडणूक लढवण्यास सांगितले आहे
हीच बाब माळशिरस तालुक्यात विजयसिंह जी मोहिते पाटील साहेब यांनी केली आणि आ रणजितसिंह मोहिते पाटील यांना राज्य सभा खासदार ते अलीकडील विधान परिषद यावर वर्णी लावून केले .
अर्थात या ही घराण्यात अनेक वारसदार असल्याने राजसिंह मोहिते पाटील यांच्या घराण्याची सोय खा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या रूपाने करण्यात आली ,
या सत्ता वाटनित पक्षीय अडथळा नको म्हणून आ रणजित सिंह मोहिते पाटील यांना निवडणूक काळात अदृश्य ठेवण्यात आले ,
माझा प्रश्न मोहिते पाटील घराण्याला हाच आहे की भाजप ने मोहिते पाटील घराण्याच्या मागणीला मान्यता देऊन लोकसभेचे तिकीट धैर्यशील मोहिते पाटील यांना दिले असते तर आ रणजित सिंह मोहिते पाटील अदृश्य राहिले असते का?
प्रकृती स्वास्थ्य नसताना ही व्हील चेअर वर बसून कुटुंब कर्ता या नात्याने विजय दादा यांनी थेट मोदी जी आणि अमित भाई शहा यांची भेट घेतली .
आत्ता या पुढील काळात जयसिंह मोहिते पाटील यांना त्यांचे नातू चि, सयाजी राजे यांना तालुक्याची गादी द्यायची असल्याने पुढील दहा वर्षाची रणनीती आखून दोन जातीतील सत्ता स्पर्धा मिटवून धनगर समाजाला आरक्षित जागेवरील सत्ता सोपवण्याचा निर्णय घेतला आणि जागा ओपन झाल्या नंतर आमची सत्ता असेल असे ही सांगितले , या साठी फक्त उत्तमराव जानकर यांचेशी चर्चा न करता धनगर समाजातील अनेक प्रमुख स्थानिक नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय एकमेकास बांधील राहील असे अभिवचन घेऊन घेतलेला आहे .
राजकीय जीवनात 10 वर्ष हा लहान कालखंड नाही ,
महाभारतात धर्मराजाची एक कथा सांगितली जाते , ते भोजनास बसलेले असताना एक भिक्षुक येतो त्यास ते म्हणतात तुम्ही उद्या या ,, त्यावर तो भिक्षुक हसतो ,
तुम्ही का हसालात? या प्रश्नाचे उत्तर धर्मराज विचारतात , तेंव्हा
तो भिक्षुक उत्तर देतो , राजन तुझ्या तोंडातील घास ही तुझ्या मालकीचा नाही , तो पोटात जाईल याची शाश्वती नाही आणि गेला तरी तो उलटून पडणार नाही हे ही सांगता येत नाही .
जीवन जिथे नश्वर आहे तिथे उद्याची बात केल्याने मला हसू आले .
उत्तमराव जानकर यांची सर्वात मोठी अभिलाषा ही आमदार बनण्याची होती , ती पूर्ण करण्याच्या ध्येयाने पछाडलेले होते ,
त्यांच्या कडे असलेला राजकीय गुण जबरदस्त आहे , आपले म्हणणे ते समोरच्याच्या गळी उतरवू शकतात ते स्किल त्यांच्या कडे नक्की आहे
माणसे हाताळण्याची त्यांची हातोटी प्रचंड आहे ,
आर्थिक उदारता दर्शवताना ते त्यांचा हात कधी आखडता ही घेत नाहीत , कोणत्याही संस्था हाताशी नसताना आपला राजकीय गट निर्माण करून तो टिकवण्यात त्यांनी यश मिळवले आहे .
माझ्या ही मनात त्यांच्या बद्दल असूया नाही , किंवा व्यक्तिगत आकस ही नाही ,
पण त्यांचा स्वभाव मला माहित आहे , त्यांचे काम असले की ते सतत संपर्कात राहतात आणि एकदा त्यांना हवे ते हासिल झाले की ते पलटी ही अशी मारतात की , की कालचा माणूस हाच होता का ? असा प्रश्न पडावा ,,
त्यांचा अनुभव आ शहाजी बापू पाटील , आ जयकुमार गोरे , आ संजय मामा शिंदे , माजी आमदार प्रशांत परिचारक आ गोपीचंद पडळकर यांनी ही घेतलेला आहे
आणि थेट देवेंद्र जी फडणवीस साहेब यांना ही टांग मारून आलेला आहे .
संसदीय राजकारणात इतका संधी साधू माणूस असणे हा दुर्मिळ प्रकार आहे ,
“ज्याचे त्याचे कर्म”फळास येते या उक्ती प्रमाणे मोहिते पाटील यांना या कर्माची फळे चाखावयास मिळतील ,
त्यांच्या सत्तेचा पाया ज्या दलितांनी विस्तृत केला तोच पाया शरद पवार व जयंतराव पाटील यांनी रणनीती आखून उध्वस्त केलेला आहे , माढा लोकसभा मतदार संघात दलीत समुदायाची मते ही निर्णायक आहेत ,
आपला हक्क आणि अधिकार मोहिते पाटील यांनी केसाने गळा कापून दुसऱ्याच्या स्वाधीन केले आहेत हे न समजण्या सारखी आजची परिस्थिती नाही .
पवार साहेब आणि अजित दादा यांच्यात कोणता संघर्ष होता?
तर तो सत्ता वारस्तत्वाचाच होता .
पवार साहेब आणि त्यांची कन्या सौ सुप्रिया ताई यांनी केंद्रीय राजकारण करावे आणि महाराष्ट्राची कमान अजित दादा यांनी सांभाळावी हा त्यांच्यातील करार होता ,
जो पर्यंत अजित दादा मोठे होते व इतर सर्व जण लहान होते तो पर्यंत हा करार आपण पाळत असल्याचे पवार साहेबांनी दर्शवले ,
सत्ता स्पर्धा करू शकतील असे नवे पर्याय आ.रोहित पवार , युगेंद्र पवार यांचे रूपाने निर्माण झाले तेंव्हा याच फळीला सुप्रिया ताई चे सोबतीला ठेऊन महाराष्ट्राच्या राजकारणाचा वारसा सोपविण्याचे पवार साहेबांनी ठरवले ,
अजित दादा यांचा सत्ता संघर्ष चालू राहणार व यात मराठा मते विभाजित होणार त्याचा फटका सुप्रिया ताई यांना बसू नये म्हणून धनगर नेतृत्वाला बळ देण्याचे त्यांनी ठरवले ,
त्यांचा बालेकिल्ला असलेल्या भागात थेट पुणे सोलापूर , सातारा , कोल्हापूर , सांगली जिल्ह्यात धनगर समाजाचे प्राबल्य मोठे आहे ,
भाजप ने निर्माण केलेला ओबीसी पँटर्न यात “माधव ” चे असलेले स्थान ही उध्वस्त करण्याचे माध्यम म्हणून उत्तम राव जानकर यांचा वापर त्यांना नेते बनवून करण्याचे त्यांनी ठरवले ,
नेते बनण्याची प्रक्रिया सत्तेतून जाते , ती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस ने उत्तमराव जानकर यांना देऊ केली , त्यांना महाराष्ट्रात आ गोपीचंद पाडळकर , माजी मंत्री राम शिंदे , आ प्रकाश अण्णा शेंडगे यांना बाजूला सारून पर्यायी नेतृत्व म्हणून विकसित करायचे असेल तर त्यांना मंत्री मंडळात ही घ्यावे लागेल , तसे ते घेतील ,,
प्रश्न हा राहणार आहे की त्यांच्या सत्ता प्रप्तीत समग्र धनगर समाज आपले प्रतिनिधित्व म्हणून समाधान मानणार आहे का?
या माध्यमातून उत्तमराव जानकर यांना सत्ता प्राप्त झाल्या नंतर सत्तेची दोन सत्ता केंद्र निर्माण होतील , व गाव पातळीवर स्थानिक मराठा नेत्यांना ” गरुडाच्या पंज्यात “सावज म्हणून राहणे पसंत पडेल काय?
महाराष्ट्रात इतरत्र कोणती स्थिती उद्भवेल?
इंदापूर येथे जाऊन उत्तम राव जानकर यांनी दत्ता मामा भरणे यांच्या विरोधात प्रचार करून हर्षवर्धन पाटील यांची सत्ता बळकट करण्याचा प्रयत्न केला ,
तोच प्रयोग ते राम शिंदे यांच्या मतदार संघात आ रोहित पवार यांचा ही करतील ,
आ गोपीचंद पडळकर यांच्या ही विरोधात त्यांना बोलावे लागेल ,
“मराठा सत्तेचे ” वाहक बनून धनगर समाजाच्या अनेक नेत्यांचे शिरकाण त्यांना करावे लागेल .
या शिवाय धनगर समाज म्हणून भाजपा पक्षात असलेले त्यांचे स्थान ही डळमळीत होईल , त्यांची जागा भाजपला दलीत समाजाची जुळणी करून भरून काढावी लागेल •
कोणतीही समीकरणे एकांगी नसतात आणि फक्त फायद्याची ही नसतात ,
धनगर नेते लक्ष्मण हाके यांनी निवडून देण्याच्या यादीत उत्तम राव जानकर यांचे नाव घातले आहे , त्यांनी मराठा आरक्षणास केलेला तीव्र विरोध सर्वश्रुत आहे ,
मनोज दादा जरांगे पाटील यांचा लढा कोण उभारत आहे ? त्या मागचे राजकारण कुणाचे आहे ? हे जाणून घेण्यासाठी शासनकर्ते म्हणून एस आय टी लावली त्याचे स्वागत आ रामभाऊ सातपुते यांनी पक्षाचा माणूस म्हणून बाके वाजवून केल्याचा राग धरून त्यांना ही मते देऊ नका असा प्रचार करायचा आणि उत्तम राव जानकर यांचा मार्ग प्रशस्त करायचा ,
आ रामभाऊ सातपुते यांनी मी 70वर्षात जेवढा विकास झाला नाही तेवढा केला , मी जनतेशी बांधिलकी मानली या वक्तव्याचा राग धरून त्यांचे पार्सल पाठवण्याची भाषा करायची ,
ज्यांनी थेट कै सहकार महर्षी शंकर राव जी मोहिते पाटील यांच्या नावाचा बोर्ड उपटून फेकून त्याची विटंबना जाहीर रित्या केली त्यांना मात्र सत्तेच्या प्राप्ती साठी माफ करून शिव रत्न वर त्यांचे औक्षण करायचे ,,
दलितांच्या पिढ्या चौकटीच्या बाहेर ठेऊन ज्यांनी फक्त शाब्दिक भाषेचे मधुर उपकार मानले त्यांचे ओझे निर्बुद्ध गाढव बनून दलितांनी किती पिढ्या वाहवून न्यायच?
याचा ही विचार केला पाहिजे ,
आमच्या सारख्या माणसांचे काम समाजाला जागृत करण्याचे आहे , सत्तेचे लोभी असतो तर छोटी मोठी सत्ता मोहिते पाटील यांचे पाय धरून मिळवता आली असती , पण साध्या ग्रामपंचायत सदस्य बनण्याचा मोह आम्ही कधी केला नाही ,
दलितांनी हिंदुत्व वाद्यांना आपले शत्रू मानून मुस्लिम समाजाला आपले राजकीय मित्र मानण्याचा नादांनपणा करू नये ,
वंचित ने सोलापूर मध्ये तो अनुभव घेतला आहे , मुस्लिमांच्या दृष्टीने ही आपण मागास वर्गीय आहोत .
ज्यांना हे पटत नसेल त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे “वेटींग फॉर व्हीजा”नावाचे पुस्तक वाचावे , जे अत्यंत छोटे आहे आणि गुगल वर उपलब्ध ही आहे ,
देवगिरी किल्ला पाहण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर गेलेले असताना पाण्याला स्पर्श केला म्हणून तलवार घेऊन जीव मारण्यासाठी आलेले मुस्लिम सुरक्षा रक्षक याचे वर्णन त्यांनी केले आहे ,
दलीत हे धनगर बहुल गावात ही शोषित आहेत ,
उत्तम राव जानकर यांच्या दगड धानोरे गावात दलितांना मंदिरात प्रवेश नव्हता याची माहिती घ्या
मंगळवेढा तालुक्यातील माचनुर या गावात धनगर पुजारी असलेले देवीचे मंदिर आहे , तेथे आज ही दलितांना प्रवेश दिला जात नाही , प्रत्यक्ष पहा आणि माझे खोटे निघाले तर मला जाहीर रित्या फाशी द्या ,,,,
ही लढाई प्रयोग करण्याची नाही हे दलितांनी समजून घ्यावे , आपण सर्व जातीय भांडवलदारी , सत्ता धारी वर्गाला पराभूत करू शकू हा अपक्ष उमेदवारांचा फाजील आत्मविश्वास आहे ,
मताचे विभाजन करून ते उत्तमराव जानकर यांना विजयी करण्यास उतावळे झालेले आहेत ,
पण असा घात तुम्ही करू नका , भस्मासुराला रोखण्यासाठी संघटित भाजपा हाच एकमेव पर्याय आहे , याचा विचार शांतपणे करावा ,
अन्यथा आहे त्या ही पेक्षा वाईट कालखंड पुढ्यात वाढून ठेवलेला आहे , 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!