भाजप वाल्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या परिवाराच्या नावाने घाणेरडे राजकारण करू नये – राजेंद्र पातोडे
विशिष्ट धर्माच्या लोकांनी फतवा काढून काँग्रेसने भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्या परिवाराचा अपमान केला आहे, असे बेजबाबदार वक्तव्य खासदार ज्ञानेश्वर पाटील यांनी अकोल्यात केले आहे.फालतू स्टेटमेंट करून आंबेडकर कुटुंबाला तुमच्या घाणेरड्या राजकारणात ओढू नका काँग्रेस आणि भाजप आमच्या साठी समान आहेत.एक नागनाथ तर दुसरा सापनाथ आहे त्यामुळे आंबेडकर नावाचा वापर आपल्या राजकीय स्वार्थ साधण्यासाठी करू नका असा जाहीर इशारा वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी दिला आहे.
वंचित बहुजन युवा आघाडी भाजपच्या हया मानसिकतेची निंदा करीत आहे.संविधान निर्माता आंबेडकर परिवाराला व आंबेडकर चळवळीला संपविण्याचा प्रयत्न काँग्रेस करीत आहे, असेही पाटील बरळले आहेत.नुसती काँग्रेसच नाही तर संघ आणि भाजप आंबेडकरी विचारधारा, पक्ष, लोकशाही आणि आरक्षण तसेच संविधानाच्या मुळावर उठले आहेत.त्यामुळे काँग्रेसच्या आडून आंबेडकर नावाने दुकानदारी करू नका.तुमच्या सारख्या धर्मांध आणि जातीयवादी पक्षाला डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही.आंबेडकरी पक्ष आणि नेतृत्व भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांसोबत लढायला समर्थ असून तुमच्या पोकळ वल्गना आणि पुतना मावशीच्या प्रेमाची गरज आम्हाला नाही.ह्यापुढे जपून वक्तव्य करा अन्यथा जाहीर सभेत ह्याचे उत्तर वंचित स्टाईलने दिले जाईल ह्याचे भान ठेवून वक्तव्य करा.धार्मिक ध्रुवीकरण आणि धर्माच्या नावावर इतरांना लक्ष्य करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर केल्यास पुढील उत्तर थेट तुमच्या बैठकीत येऊन दिले जाईल.ह्याचें देखील भान भाजपवाल्यानी राखले पाहिजे.
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश
9422160101.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत