खायचा वांदा,म्हणे आम्हीच यंदा
मी कार्यकर्ता…
ना घर का ना घाट का…. पण मी कार्यकर्ता…..
आम्ही लढतो दिन रात पण म्हणून आमचा नेता होतो महान…
मी कार्यकर्ता…
राजकारण झाले गंदे कारण वाढलेत मालकाचे धंदे.
मी कार्यकर्ता…
आम्ही दिलेत खांदे…
तरीही आमचे झालेत खायचे वांदे….
मी कार्यकर्ता…..
आम्ही केली नरड्याची ढोली…
आमच्या जीवनाची होती होळी…
मालक खातो पुरण पोळी… आम्हाला मात्र वाढली गोळी…
मी कार्यकर्ता….
मालकाने पक्ष बदलले सोळा…
आमच्या तोंडात पाणी झाले गोळा….
मालकाचा झाला सोहळा…. आम्ही मात्र…
वेगवेगळ्या रंगांच्या चटया करतोय गोळा….
मी कार्यकर्ता……
आम्हाला नाही घर ना दार…
आम्हाला मालक म्हणतो हा आमचा सरदार… सरदारांच्या हाती दांडे… मालक बदलतो वारंवार झेंडे……
मालक झाला गेंडा… आमच्या हाती फक्त झेंडा
मी कार्यकर्ता…….
रॅली काढली आम्ही…
परंतु रॅली पूर्ण होई पर्यंत..
मालकाचा पक्ष कोणता कळलेच नाही आम्हा…
मी कार्यकर्ता……
आम्ही तोडले गाडीचे सायलेंसर….
गळ्यात मफलर… डोक्यावर टोपी..
आम्ही म्हणतो…
यंदा गुलाल आमचा.. मालकाने केला आमचा चमचा……
मी कार्यकर्ता….
नाही आटत. नाही तटत…
मी कार्यकर्ता…..
माझ्या पायाला सदानकदा भिंगरी…
नेता माझा मात्र हंग्री…. कार्यकर्ता म्हणूनच आम्ही होणार डंग्री…
आमच्या हाती कधीच येणार नाही मालक ही डिग्री…
वाढते मालकाची वंशावळ….
फक्त आमची शेवटाची होती वळवळ…
तुकड्यासाठी आमची असते तळमळ…
मी कार्यकर्ता….
आम्हाला हवी मटण अंडी…
मालकाला ताप येऊन वाजून आली थंडी…
मालकाची उबवायला लागली अंडी…
त्याची होणार खंडी…. आमच्या अंगात नाही बंडी…
कारण मालकाने राजकारणाची केलीय मंडी…
मी कार्यकर्ता…..
उन्हात तापतो…
उन्हात खपतो….
मालक संपतो म्हणून मी भितो….
मालक कोणाचे गातो…
कोणाचे खातो…
कळलेच नाही कधी….
कारण राजकारण झाले गंदे…
वाढलेत त्यात धंदे….
सेवा जावून मेवा खाणारा एकत्रित आला गोतावळा….
कार्यकर्ता करतो…
वळावळा…
पळापळा….
खेळाखेळा….
मी कार्यकर्ता….
ना घर का ना घाट….
एक चपटी…
दोन हाडके….
आमची कधी ओढ्यात गेली लाकडे…
हे आम्हाला कळलेच नाही…
मी कार्यकर्ता……
MW
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत