कोणत्याही युद्धाचं यश हे रणनीती, तंत्रज्ञान आणि संघटनात्मक संरचना यावर अवलंबून असतं – अनिल चौहान

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित एका विशेष चर्चासत्रात ते बोलत होते. कोणत्याही युद्धाचं यश हे तंत्रज्ञान, रणनीती आणि संघटनात्मक संरचना यावर अवलंबून असतं, असं प्रतिपादन सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी काल पुण्यात केलं. यावेळी निवृत्त एअर मार्शल डॉ. दिप्तेंदू चौधरी, निवृत्त व्हाईस ॲडमिरल अशोक कुमार, निवृत्त लेफ्टनंट जनरल राज शुक्ला व्यासपीठावर उपस्थित होते. हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी, नौदल प्रमुख ॲडमिरल हरी कुमार, व्हाईस ॲडमिरल अजय कोचर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. तसंच संरक्षण प्रबोधिनीच्या स्मरणिकेचं आणि पुस्तकाचं प्रकाशनही जनरल चौहान यांच्या हस्ते झालं. एनडीएची आतापर्यंतची वाटचाल आणि तिथलं प्रशिक्षण यावर आधारित विशेष लघुपटाचं अनावरण यावेळी करण्यात आलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत