दिवाळी च काय कोणतेही हिन्दू सण बौद्धांचे नाहीच
कृपया बाविस प्रतिज्ञा
कडे लक्ष द्यावे खरेतर हिंदुंचे जे काही चांगले आहे ते सर्व बौद्ध धम्माचा भाग आहे ,काही ठिकाणी बुद्धाला व धम्माला संपवण्यासाठी बुद़् विचारांचा ,शब्दांचा किंवा प्रसंगाचा ब्राह्मणी विचारांनी अपभ्रंश तरी केला किंवा बुद्धाच्या चांगल्या गोष्टी उलट्या अर्थाने तरी मांडल्या आहेत. हिंदू च्या कोणत्याही सणांचा खरा पुरावा किंवा इतिहास त्यांनी पुराव्यानिशी मांडावा पण ते त्यांच्या आयुष्यात तरी तो तसे करु शकत नाही .बुद्धाचा इतिहास कोणास ही विचारा ते सांगू शकतील.
तसे पाहीले तर सर्वच सण आपले असतील ही पण खरे हे आहे की बुद्ध व धम्म विसरण्यासाठी किंवा आमच्यावर केलेल्या अत्याचाराचा ऊत्सव साजरा करण्यासाठी जाणिवपूर्वक त्यांनी वेगवेगळ्या सणांच निर्मिती केली . आणि त्याला दैव वादाचा तसेच कर्मकांडाचा लेप लाऊन तुमचे मेंदु फीरवण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला नाही हे . आणि आम्ही अविचारी लोक त्याला बळी पडलेले मानसिक अपंग आहोत , कोणत्याही सणा बद्दल आमच्याशी कोणी ह चर्चा करावी तयारी आहे दिवाळीचा ,पाडव्याचा ,पंचमीचा दस-याचा व ईतर सणांचा आणि बौद्ध धम्माचा आतातरी कोणताही संबंध नाही ,कोण होता नरक असुर ? कोण होता राजा बृहद्रथ ? कोण होता राजा बळी,? कोण होता वासुकी नाग ? यांच इतिहास वाचावा आपल्यातिल सुशिक्षित म्हणवणाऱ्या बौद्धांनी . आज आपल्या धम्माच्या काही प्रसंगांना त्यांनी दिलेले हिडिस रुप आपण का म्हणून सहण करत आहोत ? आपणास समजत नसेल तर निदान गप्प तरी बस वे पण धम्माचा नाश होईल असे करु नका .आज सणांना आलेले हिंदवी स्वरुप पाहता डॉ बाबासाहेब आंबेडकर सर्व कर्मकांडी सणांना विरोध केला आहे
आणि हो आता जे जे लोक हिंदू चे सण आपले आहे असं म्हणतात बिनडोक आहेत ,ही आर एस एस ची खेळी आहे हे समजून घ्यावे .
नको त्या विषयावर लोकांना भटकंती करायला व मजबूर करायला लावु नका .
हा आंबेडकरवादाच्या विरूद्ध अपप्रचार आहे .
सावध व्हा
एकि कडे निवडणूक फाँर्म भरतांना बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येतो आणि तिथेच जय श्रीराम घ्या घोषणा देतात हे आपणास कळत नाही काय ?
एकिकडे बाबासाहेबांचे दाखले देतात आणि दुसरीकडे समतेचे आणि लोकशाही चे संविधान दिल्लिच्या राजधानीत जाळतात ,हे कळत नाही काय,की मुद्दाम डोळेझाक करत आहात? स्वाभिमानी व लाचारीतला फरक आपणास कळत नाही काय?
कळतंय पण स्लो पाँईजन देण्याची जबाबदारी आपल्यातील काही अविचारी लोकांवर सोपवली आहेत तेच हे असं समजतात आणि असे मँसेज फाँरवर्ड करतात
कृपया
रिडल्स इन हिंदूईझम
रामकृष्णाचे गौडबंगाल
मुक्ती कोन पथे
शुद्र पुर्वी कोण होते
हे बापाचे ग्रंथ वाचा
आणि शहाणपणाचा मार्ग धरा
प्रा दि वा बागुल
पुणे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत