रिपब्लिकन चळवळीतील मुंगळे……
समाज माध्यमातून साभार
आत्ताच टिव्ही वर बातमी पाहिली, रिपब्लिकन पक्षाचा महविकस आघाडी ला पाठींबा म्हणून. पाठींबा देणारा माणूस अर्जुन डांगळे..
ऐकून याची खात्री झाली की रिपब्लिकन चळवळीतील बहुतांश लोकांना म्हातारचळ भरला आहे. आयुष्यभर जपलेली स्वतःची प्रतिमा स्वतःच गटार गंगेत मिळवत आहेत. अशी काय वेळ आली आहे या तथकथित रिपब्लिकन नेत्यावर की त्यांना असा शत्रूला निलाजरा मुजरा करावा लागत आहे?? ज्या पाजी लोकांना आंबेडकर नावाची गरज नाही अशी ते दर्पोक्ती करतात, त्यांच्याच पायावर लोळण घ्यायला आपले लोकं येवढे उतावीळ का झाले आहेत?? आंबेडकरी चळवळीची आज जी दुर्दशा झाली आहे, त्याला असले डांगळे सारखे मुंगळेच जबाबदार आहेत जे गुळाची ढेप समजून कांग्रेस नावाच्या विषारी गळू ला बळेच चिटकत आहेत.
युध्दाच्या आधीच हाराकिरी पत्करणाऱ्या कचखाऊ, भाड खाऊ, समाजाची अब्रू खाऊ गिधाडांचे करायचे काय ??
समाजाने असे मुंगळे आता पायाखाली चिरडले पाहिजेत…
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत