महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महापालिकेची सुविधांबाबत समन्वय बैठक संपन्न.

महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने येणाऱ्या अनुयायांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुवधा योग्यप्रकारे मिळतील, यासाठी महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी, मुंबई पोलिस यांनी विशेष खबरदारी घ्यावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या येत्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर परिसरातील चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे करण्यात येणाऱ्या सुविधांबाबत समन्वय बैठक नुकतीच मुंबई महापालिका मुख्यालयात संपन्न झाली. यावेळी या सुविधांमधून कोणतीही कमतरता राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी आज दिले.

या बैठकीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे व संबंधित संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने डॉ. भदन्त राहूल बोधी- महाथेरो, भिकाजी कांबळे, रमेश जाधव, श्रीकांत भिसे, संजय पवार, अरविंद निकाळजे, प्रतिक कांबळे, सो. ना. कांबळे, विलास रुपवते, मनोल गायकवाड, प्रदीप कांबळे, दिपक क्षीरसागर, डि. एम. आचार्य, अमोल साळुंके, ऊषा रामलू निशा मोदी, सुनिती मोरे तसेच नागसेन कांबळे, महेंद्र साळवे, रवी गरुड, आदींसह विविध संस्थांचे मान्यवर, पदाधिकारी देखील उपस्थित होते…बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापरिनिर्वाण दिन समन्वय बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करतेवेळी आयुक्त बोलत होते. या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, ‘बेस्ट’ उपक्रमाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सहआयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, मुंबई पोलिस दलाचे उप आयुक्त मनोज पाटील, उप आयुक्त (परिमंडळ – २) रमाकांत बिरादार, उप आयुक्त (घन कचरा व्यवस्थापन) चंदा जाधव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकी दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिमंडळ २ चे उप आयुक्त रमाकांत बिरादार यांनी दिनांक ६ डिसेंबर २०२३ च्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध सेवा-सुविधांची माहिती उपस्थितांना संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. यामध्ये प्रामुख्याने नियंत्रण कक्ष, सुशोभिकरण, टेहाळणी मनोरा, निर्देशक फुगा, छायाचित्रांचे प्रदर्शन, रांगेतील व्यवस्था, शासकीय मानवंदना, हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी, माहिती पुस्तिका, स्वच्छता व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहे, निवासी मंडप, विद्युत व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था इत्यादी बाबींची माहिती उपस्थितांना देण्यात आली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!