
गुजरात मध्ये अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये आज आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान रंगणाऱ्या अंतिम सामन्याची तयारी पूर्ण झाली आहे. या सामन्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उपप्रधानमंत्री रिचर्ड मार्लेस उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या विश्वचषकात अपराजित राहिलेला भारतीय संघ अंतिम सामन्यात खेळणार असल्याने देश विदेशातले प्रेक्षक या सामन्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत.
मध्य आणि पश्चिम रेल्वेनेही उद्याच्या सामन्यासाठी मुंबईहून पाच विशेष अतीजलद रेल्वेगाड्या सोडल्या आहेत. मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून अहमदाबाद इथं जाणाऱ्या आणि सामन्यानंतर परतीचा प्रवास करणाऱ्या या गाड्या विशेष दरानं चालवण्यात येत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी काल एका उच्चस्तरीय बैठकीत उद्याच्या सामन्यासाठी सुरक्षा व्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन आणि इतर मुद्द्यांचा आढावा घेतला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत