आंबेडकरी समाजातील हरहुन्नरी, अष्टपैलू, उपासिका सुहासिनी सोमकुवर
स्नेहलता आवनखेडकर
उच्चविद्याविभूषित व असाधारण गुणांनी संपन्न उपासिका आयुष्मती सुहासिनी जागेश सोमकुवर या खूप उंचीवर पोहोचूनही जमिनीशी नाते सांगतात. सर्वांशी अत्यंत प्रेमळ आणि नम्र वागणाऱ्या सुहासिनी यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक यशाची शिखरे सर केली आहेत. शिक्षणामध्ये त्या डबल एम. ए. म्हणजे, एम. ए. इन हिस्टरी आणि एम. ए. इन सोशियोलॉजी आहेत. तसेच त्यांनी बॅचलर ऑफ लायब्ररी ई. इत्यादी पदव्या मिळवलेल्या आहेत. त्यांनी राष्ट्र संत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटल नागपूर मधे टीचिंग सुपरिंटेंडेंट म्हणून बारा वर्ष सेवा दिलेली आहे.
त्यांचे सांस्कृतिक कार्यामध्ये अतिशय भरीव योगदान आहे. तसेच आपल्या पतीच्या सामाजिक, शैक्षणिक तसेच धम्म कार्यांमध्ये त्यांची मोलाची साथ नेहमीच असते आणि त्या सावलीप्रमाणे आपल्या जोडीदारासोबत असतात. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये डान्स, पेंटिंग रांगोळी, क्राफ्ट मेकिंग मध्ये त्यांचे विशेष प्राविण्य आहे.
आंबेडकर इंटरनॅशल मिशन तर्फे मागील एप्रिल महिन्यात क्वालालंपूर, मलेशिया येथे आयोजित इंटरनॅशनल ऑडियन्स समोर त्यांनी अत्यंत विलोभनीय वेलकम डान्स करून सर्वांची मने जिंकली होती. एवढं सगळं करूनही त्या गार्डनिंग, रीडिंग आणि ट्रॅव्हलिंग मध्ये विशेष रस दाखवतात. याची त्यांना विलक्षण आवड आहे.
आयुष्मती सुहासिनी यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. त्यामध्ये संगीत साक्षरता बहुउद्देशीय संस्थेतर्फे ‘माता रमाबाई आंबेडकर’ पुरस्कार – 2023′ तसेच नवी दिल्लीतील पंचतारांकित हॉटेल क्राउन प्लाझा, रोहिणी येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या Dazzle Platinum Mrs. India Universe 1st Runner Up 2024
& Dazzle Miss & Mrs. India Universe Mrs. Maharashtra 2024 हा किताब पटकाविला आहे.
आंबेडकरी समाजामध्ये प्रथमच एका महिलेने असा सर्वोच्च पुरस्कार पटकावला आहे. या अंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतातून आणि विदेशातून अनेक लावण्यवतींनी भाग घेऊन आपापल्या प्रतिभेचे आणि कलेचे प्रदर्शन केले. या स्पर्धेत विविधांगी टॅलेंट राऊंडस आयोजित करण्यात आले होते, जसे नृत्य, पारंपरिक वेशभूषा, कॅटवॉक, ईवनिंग गाऊन आणि प्रश्नोत्तरी वगैरे तसेच त्यांनी सादर केलेली राजमाता जिजाऊची भूमिका खूपच लक्षवेधी ठरली. हा बहुमान मिळाल्यामुळे आयुष्मती सुहासिनीचे सर्वत्र कौतुक होऊन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या यशाचे श्रेय सुहासिनी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या भक्कम पाठिंब्यासोबतच स्पर्धेचे आयोजक तबस्सुम मॅम, त्यांच्या जीवलग मैत्रिणी, आयु. स्नेहलता आवनखेडकर आणि त्यांचा मोठा मित्रपरिवार तसेच हितचिंतक यांना देतात.
आयुष्मती सुहासिनी या आंबेडकरी चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते, इंजी. जागेशकुमार सोमकुवर, जनरल मॅनेजर, ओएनजीसी, मुंबई, व राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय कार्यकारिणी, ऑल इंडिया एससी/एसटी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन, ओएनजीसी यांच्या सहधम्मचारिणी आहेत.
सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या लिलया सांभाळून अतिशय उमद्या वृत्तीने सर्व क्षेत्रांमध्ये त्या आपला ठसा उमटवीत आहेत. भावी आयुष्यात त्यांची अशीच प्रगती व्हावी हीच सदिच्छा आणि मंगलकामना!
स्नेहलता आवनखेडकर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत