मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

नळदुर्ग जवळ वागदरी शिवारात शेतकऱ्यांच्या सोयाबीनवर चोरांच्या धाडी

कृषी बी बियाणे सह सोयाबीन गेले चोरीस शेतकऱ्यास बसला ५० हजाराचा फटका

————————————– नळदुर्ग परिसरात गोर गरीब शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी पोलीसांचा ताफा वाढला

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

नळदुर्ग आणि परिसरामध्ये वागदरीच्या शिवारामध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये गरीब शेतकरी शिक्षा रमेश जिटीथोर यांनी शेतातील सोयाबीनची रास करून ७० किलो वजनाचे सोयाबीनचे पोते भरून ठेवले होते परंतू सदरील अज्ञात चोरट्यांनी या सोयाबीनवर चांगलाच डल्ला मारला असून यामध्ये कृषी बी बियाणे ची ही चोरी खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे .
या संदर्भात सदरील नळदुर्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध शिक्षा जिटीथोर यांनी फिर्याद दिली आसुन आज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे
सविस्तर माहिती आशी की
वागदरी गावाच्या शिवारात शेतकरी महिला शिक्षा रमेश जिटीथोर व त्यांचे पती रमेश जिटीथोर हे दोघे शेती बघतात वागदरी शिवारात यांच्या शेतात पत्र्याचे शेड मारले आसुन या शेड मधील ७० किलो वजनाचे सोयाबीनचे ३० पोते व ३० किलो वजनाचे कृषी बी बियाण्याचे ३० किलो वजनाचे ११ पोते असे एकूण ४१ पोत्यांची चोरांनी चोरी केली आहे याची सदरील अंदाजे किंमत ५५ हजार ६०० रुपये एवढी असून .या गरीब शेतकऱ्यावर परत एक बार चोरट्या कडून संकट ओढवले आहे
सदरील अज्ञात चोरट्याविरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यामध्ये नळदृग ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली ३३४ [ १ ] व ३०५ [ ऐ ] नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
यासंदर्भात पोलिसात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला असून नळदुर्ग ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग आणि परिसरात पोलिसांचा ताफा खुप मोठ्या प्रमाणात गस्त घालत आसल्याचे दिसुन येत आहे गोर गरीबांच्या शेतकऱ्यावर डल्ला मारणाऱ्या चोरट्यांना लवकरच पकडण्याचा ध्यास नळदुर्ग पोलिसांनी घेतला आहे .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!