‘बार्टी’ मनुवादी राजकारणाचा अड्डा!
राजेंद्र पातोडे
डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे अर्थात बार्टी ही मनुवादी राजकारणाचा अड्डा बनला आहे.ज्या संशोधन आणि प्रशिक्षण कार्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली आहे.ते मूळ कार्य सोडून मलिदा लाटणे आणि अनुसुचित जाती मध्ये विष कालविणे, प्रशिक्षणार्थी, विद्यार्थि, विशिष्ठ अधिकारी वगळता इतर सर्व कर्मचारी ह्यांचा छळ आणि अनागोंदी कारभार ह्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेली संस्था वादग्रस्त बनविली आहे.पुण्यातील संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मंत्रालयातील काही आमदार, मंत्री व अधिकारी ह्यांची एक साखळी तयार करून बार्टी मध्ये कमाई साठी नियमबाह्य पद्धतीने कामकाज सुरू आहे.प्रशिक्षण संस्था निवडीत रोकडा पद्धतीची निवड, संशोधक विद्यार्थ्यांना वेठीस धरणे, संघाचे अधिकारी नेमून प्रचंड प्रशासकीय गोंधळ माजविणे सुरू आहे.त्याचा पुढील एक एपिसोड समोर आला आहे.येथे कार्यरत प्रतिनियुक्तीवर असलेले महासंचालक, निबंधक पासून बरेच अधिकारी हे भाडे तत्वावर अर्थात प्रतिनियुक्तीवर नेमले आहेत.त्यापैकी सतीश पाटील आणि सत्येंद्र चव्हाण ह्यांचा प्रतिनियुक्ती कालावधी संपला म्हणून त्यांना तडकाफडकी पदमुक्त करण्याचे आदेश सुनील वारे ह्यांनी काढले आहेत.तर काही सक्षम महिला अधिकारी ह्यांनी बार्टी सोडणे पसंत केले आहे.मात्र बार्टी पुणे प्रतिनियुक्ती कालावधी संपलेल्या निबंधक श्रीमती इंदीरा आस्वार ह्यांचा कालावधी ११.१०.२०२४ संपला आहे. त्यांना देखील पदमुक्त करणे बाबत दिनांक ११.१०.२०२४ रोजी पदमुक्त करण्याचे पत्र महासंचालकांनी काढने अपेक्षित होते.
श्रीमती इंदिरा आस्वार या बार्टी येथे निबंधक पदावर प्रतिनियुक्तीने कार्यरत आहेत, नियुक्ती पासूनच श्रीमती आस्वार ह्याच्या वादग्रस्त कार्यपद्धती बाबत तक्रारी आहेत. बार्टी प्रशासनात मनमानी चालविली जात आहे. बार्टीचे महासंचालक यांची अनाकलीय संमती आहे.
राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना अनेकवेळा प्रतिनियुक्तीने त्याच विभागाच्या दुसऱ्या कार्यालयांमध्ये प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात येत असते प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याच्या धोरणांमध्ये सुधारणा करणेबाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दि. २८ जुलै २०२१ रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे प्रतिनियुक्ती नियुक्ती धोरणांच्या दि. १७.१२.२०१६ च्या शासन निर्णयातील परि. ५ क मध्ये काही नविन मुद्दे नव्याने अंतर्भाव करण्यात आलेले आहेत. यांमध्ये सुधारित धोरणांनुसार प्रतिनियुक्ती धोरणानुसार वाटप करण्यात येणाऱ्या महसूली विभागाच्या बाहेर अन्य कोणत्याही महसूली विभागामध्ये प्रतिनियुक्ती नियुक्ती करता येणार नाहीं. ह्याला श्रीमती अस्वार ह्या अपवाद आहेत, त्यांच्या करीता नियम धाब्यावर बसविला आहे. बार्टीचे माजी महासंचालक यांनी श्रीमती आस्वार यांचे कामकाजातील गंभीर अनियमितता व सदोष कार्यपद्धतीमुळे त्यांच्यावर कारवाई
करून त्यांना दि. ६/१/२०२३ रोजी कार्यमुक्त केले होते. तसेच दि. १३/१/२०२३ रोजी त्यांचे विभागीय चौकशी प्रस्तावित करणे बाबत सामाजिक न्याय
विभागाचे सचिव यांनी अहवाल दिलेला होता, मात्र खूप उशिरा श्रीमती अस्वाचार ह्यांचे विरूद्ध विभागीय आयुक्त यांचे कार्यालयामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्या बार्टी मध्ये अद्याप त्याच पदावर प्रतिनियुक्तीने कायम आहेत.
सामाजिक न्याय विभागामार्फत इंदीरा आस्वार यांना दिले जाणारे संरक्षण अत्यंत गम्भीर बाब आहे.
जनप्रतिनिधी झांचे पत्रावर मा. मुख्यमंत्री महोदय यांनी सचिव सामाजिक न्याय विभाग यांनी तात्काळ कार्यवाही करावी असा शेरा दिला। होता, तरी सुद्धा सामाजिक न्याय विभागाने अद्याप कारवाई केली नाही.
बार्टी येथील कामामधील अनियमितता व संदेहस्पद कार्यपद्धतीबाबत श्रीमती इंदौरा आस्वार यांची चौकशी होण्यासाठी सचिव सामाजिक न्याय विभाग व महासंचालक बाटी बांना श्रीमती आस्वार यांना त्वरीत पदमुक्त करणे आवश्यक असताना त्यांना संरक्षण दिले जाते.
करीता बार्टी पुणे प्रतिनियुक्ती वरील निबंधक श्रीमती इदीरा आस्वार ह्यांना पदमुक्त करून त्यांची विभागीय चौकशी व्यवस्थित व्हावी, अश्या आशयाचे अनेक तक्रारी शासन दरबारी दाखल आहेत.त्यांची प्रतिनियुक्ती कालावधी संपला असून देखील त्यांना नियमबाह्य पद्धतीने मुदतवाढ देण्यात आली आहे.तीन वर्षे पूर्ण झालेल्या अधिकारी ह्यांची बदली करण्याचे निवडणुक आयोगाचे निर्देश धाब्यावर बसवले आहेत.उलट सरकारने नव्याने आर्टी संस्थेच्या निबंधक पदावर नियुक्ती करीत त्यांना बार्टीमध्ये देखील कायम ठेवले आहे.एवढेच नव्हे तर अनुसुचित जाती वर्गीकरण समिती मध्ये सदस्य सचिव म्हणून देखील नियुक्ती करण्यात आली आहे.एकाच संस्थेत एका वेळी वेगवेगळे नियम लावून काहीना बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे तर काहींना एकाच वेळी अनेक ठिकाणी नियुक्ती दिली जाते.हयात सुरू असलेले राजकीय डावपेच उघडपणे राबविले जात आहेत.सदर प्रतिनियुक्तीवर विषयी कायदेशीररीत्या कार्यवाही साठी वंचित युवा आघाडीने निवडणुक आयोगा कडे देखील तक्रार केली आहे.पुण्यात बसलेले भ्रष्ट अधिकारी आणि त्यांचे पाठीराखे ह्यांना कसलीच भीती वाटत नाही.सद्या बार्टी म्हणजे संघाची स्थानिक शाखा बनली असून वारे आणि अस्वार अश्या दोन अधिकारी ह्यांची मालमत्ता बनला आहे.निवडणुक आयोग ह्या वर लगाम घालण्यासाठी काही निर्णय घेतो की राजकीय वरदहस्त लाभलेल्या अधिका-या पुढे लोटांगण घालतो हे लवकरच स्पष्ट होईल.
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश.
9422160101
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत