देश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिकसामान्य ज्ञान

हान कांग – पहिल्या आशियाई महिला नोबेल साहित्यिक…

प्रा. रफीक शेख,

ऐतिहासिक आघात आणि त्यातून व्यक्त होणारी मानवी जीवनातील अस्थिरता याचा धांडोळा घेणाऱ्या उत्कट काव्यात्मक गद्याला (पोएटिक प्रोज) दक्षिण कोरियातील प्रसिद्ध लेखिका
हान कांग यांच्या साहित्याला यंदाचं ‘नोबेल पारितोषिक’ जाहीर झालंय…

दक्षिण कोरियातील ह्या पहिल्या लेखिका आहेत, ज्यांनी जगणं टिपणारं उत्कट वास्तव आपल्या ‘गद्यकवितेंतून’ सतत युद्धग्रस्त असलेलं कोरीयन जगतातील आधुनिक इतिहासाच्या वेदनादायी जखमांच्या व्रणाना शब्दबद्ध करीत साहित्यातून मांडणी केलीये, हे साहित्य मानवी मूल्यांच्या अधीसुरक्षिततेंसाठी,मानव अधिकार आणि संवर्धनासाठी मार्गदर्शक आहेत..

देशोदेशीचं जगप्रसिद्ध साहित्यकृती अनुवादीत स्वरूपात प्रादेशिक भाषात आलं पाहिजे.. मराठीच्या अभिजात शब्दसाहित्यांत आणि दर्जेत ‘कोरीयनं साहित्य’ आलं पाहिजे असं मला वाटतं.

हान कांग सारख्या तरुण लेखिका जगातल्या त्या सर्वं तरुणीच्या ‘आयडॉल’ होण्यापूर्वी त्यांचं संवेदनशील लेखन वाचलं आणि मेंदूत झिरपलं पाहिजे तरंच मानवी वेदनांना साहित्याची एक नवी पहाट मोकळी होईल…

हान कांग यांचा लेखनप्रवास खडतर आणि संघर्षमय दिसून येतं आणि प्रकर्षाने जाणवतं की, प्रसिद्धीच्या वाटेवर रेंगाळण्यासाठी भाग पाडणारी ‘लोकेषणा’ आणि सत्याची मांडणी केल्यास आपण बाजूला पडू अशी भीती दाखवणारी ‘जननिंदा’ या दोन्हींच्या पलीकडे जाऊन केलं जाणारं लेखन हेच ‘हितेन सहितं’ या साहित्याच्या कसोटीवर टिकतं!

-एक मराठी साहित्य प्रेमी…
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख,
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.facebook.com/share/p/DLFVTcYuQpwALrcw/

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!