उपासिका, आयुष्मती सुहासिनी जागेश सोमकुवर यांनी ‘डॅझल मिसेस इंडिया युनिव्हर्स 2024’ आणि ‘मिसेस महाराष्ट्र’ स्पर्धेत प्रथम उपविजेतेपद पटकावले
उपासिका आयुष्मती सुहासिनी जागेश सोमकुवर यांनी नवी दिल्लीतील पंचतारांकित हॉटेल क्राउन प्लाझा, रोहिणी येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या ‘डॅझल मिसेस इंडिया युनिव्हर्स 2024’ आणि ‘मिसेस महाराष्ट्र’ स्पर्धेत प्रथम उपविजेतेपद पटकावून आंबेडकरी समाजाचे नाव उंचावले आहे. ‘मिस अँड मिसेस युनायटेड नेशन्स’ आणि ‘मिस अँड मिसेस इंडिया यूनिवर्स’ या अंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतातून आणि विदेशातून अनेक लावण्यवतींनी भाग घेऊन आपापल्या प्रतिभेचे आणि कलेचे प्रदर्शन केले. या स्पर्धेत विविधांगी टॅलेंट राऊंडस आयोजित करण्यात आले होते, जसे नृत्य, पारंपरिक वेशभूषा, कॅटवॉक, ईवनिंग गाऊन आणि प्रश्नोत्तरी, त्यांनी सादर केलेली राजमाता जिजाऊची भूमिका खूपच लक्षवेधी ठरली. हा बहुमान मिळाल्यामुळे आयुष्मती सुहासिनीचे सर्वत्र कौतुक होऊन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
उच्चविद्याविभूषित व असाधारण गुणांनी संपन्न आयुष्मती सुहासिनी या आंबेडकरी चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते, इंजी. जागेशकुमार सोमकुवर, जनरल मॅनेजर, ओएनजीसी, मुंबई, व राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय कार्यकारिणी, ऑल इंडिया एससी/एसटी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन, ओएनजीसी यांच्या सहधम्मचारिणी आहेत.
या यशाबद्दल आयुष्मती सुहासिनींनी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या भक्कम पाठिंब्यासोबतच स्पर्धेचे आयोजक तबस्सुम मॅम, त्यांच्या जीवलग मैत्रिणी, आयु. स्नेहलता अवनखेडकर, आयु. निहारिका सदाफुले व आयु, मीनाक्षी नागदिवे, मोठा मित्रपरिवार तसेच सर्व हितचिंतक यांचे त्यांनी वेळोवेळी केलेल्या प्रोत्साहनाबद्दल आणि मार्गदर्शानाबद्दल विशेष आभार मानले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत