देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

वाचन प्रेरणा दिन….

डाॅ.दिलीपकुमार कसबे

आयुष्यभर ज्ञानग्रहण करून आपल्या जीवनाचा पाया रचणारे डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्म १५ आक्टोंबर १९३१ रोजी तामिळनाडू राज्यातील पंबन बेटावरील रामेश्वरम या ठिकाणी एका तमिळ मुस्लिम कुटुंबात झाला होता.त्यांचा हा जन्म दिन संपूर्ण देशात “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा होत असतो.आजच्या तरूण पिढीने हा आदर्श घेऊन आयुष्यात कसा आपण आपला व वैश्विक पातळीवर देशाचा विकास साधू शकतो,देशाचे नाव कमवू शकतो.हे पाहिले पाहिजे.तरच आपला भारत देश जगात सर्वच बाबतीत अर्थात शिक्षण, व्यवसाय,रोजगार, संरक्षण, संस्कृती, आणि मानवता इत्यादी बाबतीत उंच उंच भरारी घेतांना दिसेल.आजच्या या दिवसाचे औचित्य साधून प्रत्येक विद्यार्थ्यांने स्वतःला वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे तरच आपली प्रगती होऊ शकते.आजच्या यांत्रिक, तंत्रज्ञान च्या युगात संगणक, मोबाईल चा वापर जरूर केलाच पाहिजे पण एक माणूस म्हणून जगायचे असेल तर वाचन संस्कृतीचा विकास ही होणे ही अतिशय गरजेचे आहे.हे मात्र म्हणावेच लागेल.

डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलाब्दिन अब्दुल कलाम .म्हणजेच ए.पी.जे.अब्दुल कलाम होय. वडील जैनुलाब्दिन एका मारकर बोटीचे मालक व स्थानिक मशिदीचे इमाम होते .चांगली शेतीवाडी ही होती.पण हे एक चक्र असते व ते फिरते राहते.त्यांच्याबाबतीत ही ते चक्र फिरले पण त्यांनी आपल्या श्रमातील सातत्य चिकाटी सोडलेली नव्हती.संकटे येतात संकटे जातात हे मात्र विसरता कामा नये.आपण वाटचाल करत राहिले पाहिजे.डाॅ.ए.पी.जे. अब्दुल कलाम हे बालपणी विद्यार्थी दशेत मध्यम स्वरूपाचे विद्यार्थी होते.सरासरी गुण मिळविणारे होते.सतत गणिताचा अभ्यास करायचे.पण अभ्यासात सातत्य असायचे,ठेवायचे.श्वार्टझ हायर सेकंडरी स्कूल रामनाथपुरम या ठिकाणी पूर्ण केल्यानंतर पुढे १९५४ मध्ये सेंट जोसेफ काॅलेज तिरूचिरापल्ली येथे भौतिकशास्त्र ची पदवी घेऊन १९५५ मध्ये मद्रास इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीज मध्ये त्यांनी एरोस्पेस अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले .त्यांना वाटत होते आपण “फायटर पायलट” व्हायचे पण त्यांचे ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही ,कारण पात्रता फेरीत ते नवव्या स्थानावर होते आणि आयएएफ मध्ये जागा आठच होत्या.पण ते थांबले नाहीत त्यांचा प्रवास सुरूच होता.पुढे ते संरक्षण, संशोधन आणि विकास सेवा संस्था (DRDO) चे सदस्य बनले.व एरोनाॅटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट मध्ये शास्त्रज्ञ झाले व त्यांनी हाॅवर क्राप्ट करून कारकीर्दीची सुरुवात केली.आणि अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे काम करू लागले.

क्षेपणास्त्र विकासाच्या प्रयत्नात त्यांचा खूप मोठा सहभाग होता.यामुळेच ते भारताचे ” मिसाइल मॅन ” म्हणून ओळखले जातात. त्यांचे कर्तृत्व पाहता २००२ मध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व तत्कालीन विरोधी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या दोघांच्या पाठींब्याने त्यांची राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली.२५ जुलै २००२ ते २५ जुलै २००७ या पाच वर्षाच्या काळात देशाचे ११ वे राष्ट्रपती म्हणून यशस्वी कारकीर्द झाली.या काळात आपली जबाबदारी सांभाळत वाचन,लेखन ही संस्कृती जोपासली. जे परिश्रम घेतात,अभ्यास करतात, कष्ट करतात उद्योगात मन रमवितात ते आयुष्यात यशस्वी होता.जे धर्मात गुरफटत राहतात ते जमीनीवरच राहतात व जे विज्ञानात रमतात ते अंतराळात जातात. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मध्यम गतीतून पुढे गेले सतत वाचनात रमले.या देशात राहणार्या सर्व जाती धर्म समूहांचा अभ्यास केला ,देशाच्या संविधान लिखानाची यशस्वी जबाबदारी पूर्ण करून भारतातच नव्हे तर जागतिक किर्तीचे विद्वान म्हणून गणले जातात.त्याचबरोबर ८ व्या शतकात इराण मधून आपल्या देशात आलेले पर्शियन टाटा समूहातील रतन टाटा आपल्या उद्योग व्यवसायाने या देशात जागतिक किर्तीचे उद्योग रत्न म्हणून नावारूपास आले .जगावे परी कीर्ती रूपी उरावे.जगावे स्वत:साठी नव्हे तर इतरांच्या साठी.आपण या जगाचे अंग आहोत.आपण कोणत्याही जाती, धर्म, पंथ,संप्रदायाचे असो.सर्वांना सोबत घेऊन जगलो तरच जगलो.हाताला पाच बोटे असतात पण ती लहान मोठी असतात. त्यांच्याशिवाय पंजा पूर्ण होऊच शकत नाही. त्याच प्रमाणे ए.पी.जे.अब्दुल कलाम आयुष्य भर देशासाठी,देशाच्या विकासासाठी जगत राहिले हा आदर्श आजच्या पिढीने समोर ठेवला पाहिजे.

यशस्वी सर्वच लोक हे महापुरुष असतात.हेच या महान विभूतींनी जगाला दाखवून दिले आहे.भारत मटले की विभूतींची आठवण होणारच .हे मात्र खरे.

               राष्ट्रपती सारखे सर्वोच्च पद भूषविल्यानंतर पदाचा कार्यकाळ  संपल्यानंतर राष्ट्रपती भवनातून केवळ दोन बॅगा घेऊन ते बाहेर पडले.त्यांच्या नावावर फारसे काहीही स्थावर नाही.एक बूट,सहा शर्ट,चार टी शर्ट, एक भारतरत्न, अन्य काही पुरस्कार, तीन पीएच.डी.२५०० पुस्तके या पलीकडे  काहीही नव्हते.राष्ट्रपती पदानंतर शिक्षण, लेखन,आणि सार्वजनिक सेवेच्या नागरी जीवनात परतले.त्यांनी आपले काम करत असतांना अनेक ग्रंथांचे लेखन केले.त्यातील अनेक ग्रंथाचे अनेक भाषेतून,मराठीतून ही अनुवाद ही झालेले आहेत.त्यांनी अधिकतर पुस्तकांचे लेखन इंग्रजीतून केलेले आहे.काही नावे पुढील प्रमाणे : "इग्नायटेड माइंडस :अनलीशिंग द पाॅवर विदिन इंडिया" (प्रज्वलित मने,मराठी अनुवाद),इंडिया 2020 ए व्हिजन फाॅर द न्यूमिलेनियम इंडिया- माय ड्रीम उन्नयन, "एनव्हिजनिंग ॲन एम्पाॅवर्डनेशन फाॅर सोसायटल ट्रान्सफाॅरमेशन "," विंग्ज ऑफ फायर"(अग्निपंख) ,"सांयटिस्ट टू प्रेसिडेंट टर्निंग पाॅइंट्स ","टार्गेट द मिलियन," ट्रान्सेन्डन्स: माय स्पिरिच्युअल एक्स्पिरियन्सेस विथ ", "स्केर्मअरिंग द सर्कल सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसास. " यातील काही पुस्तकांचे ते सहलेखक आहेत.याच्याशिवाय आणखी ही काही पुस्तके आहेत. हे पाहिल्यानंतर नक्कीच जाणविल्याशिवाय राहणार नाही की खरोखरच त्यांच्या जन्म दिनी हा वाचन प्रेरणा दिन म्हणून का साजरा होत आहे. त्याचे स्वागत  आपण सर्वानीच करून वाचन संस्कृतीस वाहून घेऊया.तरच त्यांचा जन्म दिन सार्थक होईल. ते शेवट पर्यंत काम करत राहिले.वयाच्या ८३ व्या वर्षी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग या ठिकाणी २७जुलै २०१५ रोजी व्याख्यान देत असतांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते म्हणायचे " जर अयशस्वी झालात तर कधी ही हार मानू नका,कारण FAIL म्हणजे शिकण्याचा पहिला प्रयत्न " फेल होण्याचा निश्चय पक्का असेल तर अपयश मला कधीच मागे टाकणार नाही.प्रतिभा समान नसते पण ती विकसित करण्याची समान संधी आहे." जर आपण त्यांच्या आदर्शांचे,शिक्षणातील चिकाटी चे जगण्यातील संस्कारांचे देश प्रेमाचे योग्य पालन केले तर नक्कीच यशस्वी होऊ शकतो..

                  डाॅ.दिलीपकुमार कसबे, 
               स.गा.म.काॅलेज,कराड

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!