छत्रपती शिवराय , फुले , शाहु आंबेडकर , बाळासाहेबांचे विचार आत्मसात करा :- विजयकुमार
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
गुणवत्ता पुर्ण शिक्षण समूहाच्या वाटचालीत विद्यार्थांना शिक्षण घेण्यासाठी शिक्षकांनी महत्वपूर्ण भूमिका बजावत प्रामाणिक शिक्षण देण्याचे काम शिक्षक करतात कारण विद्यार्थांच्या गुणवत्तेवर शिक्षकाची कळते म्हणून शिक्षणा बरोबर महापुरुष ही वाचा छत्रपती शिवराय , फुले , शाहु , आंबेडकर व हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वाचा मग तुला नकीच शैक्षणिक सुखाचा मार्ग कळतो असे परखड मत विजयकुमार कुलकर्णी यांनी केले .
नळदुर्ग येथे नुकताच महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने १० वी १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न करण्यात आला त्यावेळेस ते कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते .
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आयोजित गौरव गुणवंतांचा हा कार्यक्रम डॉ. आंबेडकर इंग्लिश मीडियम स्कूल नळदुर्ग येथे संपन्न करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे युवा नेतृत्व दिनेश बंडगर, जिल्हा उपाध्यक्ष श्री सिद्धेश्वर विभुते, विद्यार्थी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष संतोष विधाते, खंबीर नेतृत्व आण्णाराव गायकवाड डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लीश मेडीयम स्कुलचे मुख्य प्रवर्तक मारुती , पत्रकार दादासाहेब बनसोडे , लहुजी शक्ती सेनेचे राज्य उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड, नळदुर्ग शहरातील सदन व्यापारी मदन घोडके इत्यादी मान्यवरांच्या हस्ते दहावी व बारावी परीक्षेमध्ये उत्कृष्ट यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व विद्यार्थी गुण गौरव सोहळा संपन्न करण्यात आला .
प्रथमता माता क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पुष्प पुजन करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष सिद्धेश्वर विभुते यांनी केले या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षीका सुरेखा मोरे परिचारिका संगीता गायकवाड – चिमणे , वैष्णवी कुलकर्णी , दिपीका स्वामी , विद्या विभुते यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न करण्यात आला यूवा सेनेचे राज्य समन्वयक दिनेश बंडगर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपिका स्वामी यांनी केले तर आभार श्री सिद्धेश्वर विभुते यांनी मानले.
शिक्षक भास्कर वाघमारे महेश सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्त प्रशांत माळगे , गणेश विभुते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत