विषमतेची मूलतत्वे पाच .
दत्ता तुम वाड
साऱ्या जगात विषमता आहे,याचा अर्थ हे जग अन्यायकारक आहे,अन्यायी आहे,याचा दुसरा अर्थ या जगात म्हणजे जगातील प्रत्येक देशात समता नाही,व्यक्तीला न्याय मिळत नाही,सामाजिक न्याय नाही.म्हणजेच आर्थिक सामाजिक राजकीय अन्याय आहे,तो नष्ट करून न्याय प्रस्थापित करण्याचे वचन भारतीयांना संविधानाने दिले आहे, म्हणून ते कितपत मिळते हे सर्वांना ज्ञात आहे.विषमतेच्या व्यवस्थेत न्याय मिळेल याची गॅरंटी नाही.त्यासाठी समतेची च व्यवस्था पाहिजे,विषमता का ? कशामुळे ? तिची मूळ कोणते ? ते पाहू या.म्हणजेच विषमतेची मूळ तत्व अशी._ 1 शोषण 2 वर्चस्व 3 श्रेष्ठत्व 4 वंश त्व 5 भेदभाव _
1.शोषण : मानवी जीवनाची जी अंगे आहेत,त्या प्रत्येक क्षेत्रात शोषण आहे.आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक या सर्वच क्षेत्रात शोषण दिसून येते.आर्थिक क्षत्रा त श्रमिक मजूर कष्टकरी शेतमजूर गिरणी कामगार ,कंपनीतील कर्मचारी , यांना कामाचे तास वाढविणे आणि जास्तीची कामे करून घेणे,तसेच कमीत कमी मजुरी पगार देणे हे मालक लोक आणि सरकार करते,म्हणजे शोषण करते,तसेच अधिक नफा,व्याज,कृत्रिम महागाई करणे,साठेबाजी,भ्रष्टाचार,दलाली,कंत्राटी,भरमसाठ टॅक्स ,असे अनेक आर्थिक गोष्टीतून जनतेचे शोषण केल्या जाते,यास आर्थिक शोषण म्हणतात.तसेच नसेच्या वस्तूंचे उत्पादन विक्री यातून नफा म्हणजे लोकांना दारू गांजा चरस अफिम अश्या नशिल्या पदार्थाची सवय लावणे,बिडी सिगारेट तंबाखू गुटखा ची सवय लावायची म्हणजेच जास्तीत जास्त जनतेस नशिले पदार्थ देऊन त्यांना लुटायचे,हे पण एक प्रकारचे शोषणाच होय.विकृत नाच गाणी सिनेमाची सवय लावून जनतेस लुटणे,तस्करी या साऱ्या गोष्टीतून शोषण होते.शोषणातून मग गरीब मध्यम श्रीमंत गर्भ श्रीमंत भांडवलदार असे आर्थिक स्तर म्हणजे वर्ग निर्माण होतात.वर्गीय समाज निर्माण होतो.
२. वर्चस्व : हे विषमतेचे दुसरे मूळ तत्व होय.माणसात सद्गुण व दुर्गुण हे दोन्ही गुण कमीजास्त प्रमाणात जन्मतःच असतात.अर्थात त्याच्या भोवतीचे वातावरण ,कुटुंब,संस्कार,बाहेरील वातावरण, संगत,आणि एकंदरीत व्यवस्था जसी असेल त्या नुसार त्याच्यातील सद्गुण आणि दुर्गुनाची वृध्दी होत असते.तो विषमतेच्या वातावरणात म्हणजे व्यवस्थेत राहत असेल तर त्याच्या दुर्गुणास खतपाणी मिळते. त्याचा अहंकार वाढतो.लोकात अहंकाराची वाढ जोमाने होते,अहंकारातून वर्चस्वाच्या गुणाची मजबुती वाढ होते.साऱ्याच व्यक्तीत अहंभाव,मोठेपणा,श्रेष्ठत्व याची भावना वाढीस लागते,त्यामुळे एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात.स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानतात,इतरांस कनिष्ठ तुच्छ लेखतात.अश्या वर्चस्वाच्या भावनेतूनच हुकुमशाही जन्मास येते. प्रत्येक माणसास इतरांवर राज्य करावे,इतरांना गुलाम नोकर करावे आणि आपण जमीनदार ,भांडवलदार ,व्हावे,असे वाटते.यातून सरंजाम शाही जन्मास येते.सरंजाम शहीतून राजेशाही आणि रजेशहीतून हुकूमशाही निर्माण होते,हे इतिहासातून आपणास शिकायला मिळते.तसेच जमिंदरितून कारखानदारी आणि त्यातून भांडवलदार आणि त्यांची भांडवलशाही जन्मास येते.त्यातून साम्राज्यशाही जन्मास येते.भांडवल दारांची साम्राज्यशाही.जी सध्या जगात अस्तित्वात आहे.विद्यमान आहे.यामुळे विषमतेची व्यवस्था आहे.याचे मूलतत्वे पाच पैकी वर्चस्व .म्हणजे हुकुमशाही. अर्थात भांडवली लोकशाही ही सुद्धा अप्रत्यक्ष हुकुमशाही च असते.कारण ती विषमतेतील असते.म्हणजे समतेच्या व्यवस्थेतील लोकशाही नसते.एका वर्गाचे वर्चस्व म्हणजेच त्या वर्गाचे सरकार.त्या वर्गाची हुकुमशाही.
3.श्रेष्ठत्व : हे विषमतेचे तिसरे मूलतत्व होय. एकमय एकसंघ समाजात वर्ग जाती निर्माण करून समाजाचे समूह बनून ,म्हणजे समुद्राचे अनेक डबके बन उन ,एकसंघ समाजाचे आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक अनेक तुकडे करून म्हणजे अखंड समाजास दुभंगून त्यांचेत वरिष्ठ कनिष्ठ,श्रेष्ठ कनिष्ठ,वरचा खालचा असा भेद किंवा वर्गीय सामाजिक उतरंड निर्माण करणे म्हणजे जनतेत श्रेष्ठ कनिष्ठ असा विचार पेरून विषमता निर्माण करणे म्हणजे श्रेष्ठत्व होय.हे विषमता निर्माण करते.हा एक विचार,ही एक भावना,एक तत्व होय _
4.वंश त्व : हा सुध्दा एक कुविचार आणि दुष्ट भावना होय.वंशाचे श्रे्ठत्व,अभिमान गर्व आणि त्यातून आपलाच वंशाचे लोक आपल्या देशात हवे.इतर वंशाच्या ना संपविले पाहिजे,हा विचार,यासाठी आपल्याच वांशात लग्न करणे,म्हणजे आपलाच वंश वाढविणे ही भावना जी शास्त्रीय दृष्ट्या व वैज्ञानिक दृष्ट्या चुकीची आहे.तरी वंशाचा आग्रह हा गर्व.त्यातून विनाश.मानव जातीला धोका निर्माण झाला आहे.यामुळे विषमता निर्माण झाली.विषमतेची व्यवस्था निर्माण झाली.पूर्वी म्हणजे निसर्गतः नव्हती.ती या तत्वामुळे व तत्त्वज्ञान मुळे विषमता निर्माण झाली.वंश त्वाचे विचारामुळे च जाती निर्माण झाल्या.जातीव्यवस्था अस्तित्वात आली.जी मानवजातीच्या विकासास अडसर. _
5.भेदभाव : म्हणजे शिवाशिव,अस्पृश्यता ,जी मानवजातीला कलंक आहे.सर्व माणसे सारखी असताना काही ज्या जातीच्या लोकांनी स्वच्छतेची कामे केली,मेलेली माणसे,जनावरे यांना पुरण्याचे जाळण्याचे काम केले,घाणीचे साम्राज्य नष्ट केले,दुर्गांधित स्वतः राहून दुर्गंधी नाहीशी करण्याचे काम केले अश्या व्यावसायिकांना त्यांची एक जात निश्चित करून त्या जातींना उदा. भंगी, ढोर,चामार, महार, मांग अश्या जाती तयार करून त्यांना अस्पृश्यता च शिक्का लावणे,तसेच स्त्री ही काम करणारी,म्हणून तिला कमी लेखणे,तिला मासिक पाळी होते म्हणून तिला घाणेरडी समजून ,तिलाही अस्पृश्य समजणे ,म्हणजे मानवी हक्क हिरावून घेणे होय,एक प्रकारचा सामाजिक अन्याय होय.तो अन्याय या भेदभाव चे तत्वामुळे निर्माण झाला.अस्पृश्यता ,स्त्रीपुरूष भेदभाव ,स्पृश्य अस्पृश्य असा भेदभाव निर्माण झाला या भेदभाव चे तत्व स्वीकारले मुळे. . एकंदरीत शोषण श्रेष्ठत्व वर्चस्व त्व वंश त्व भेदभाव या पाच तत्त्वांचा म्हणजेच विचाराचा स्वीकार केल्यामुळेच विषमता निर्माण झाली. .
लेखक: दत्ता तुम वाड.सत्यशोधक समाज नांदेड.दिनांक: 1ऑक्टो.2024.फोन: 9420912209.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत