आंबेडकरी समाजाचे राजकीय वास्तव!
प्रा.मुकुंद दखणे.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना फक्त बौद्ध किंवा मागासवर्गियांचे नेते असे मर्यादीत करीत, विचार पेरणे हे संकुचित आहे. त्यांचा राष्ट्रीय,जागतिक बंधुभावाचा विचार, तसे करण्यास मनाई करतो.
दुसरी गोष्ट की, विभाजित प्रवृत्ती ही फक्त आंबेडकरी समाजाला, किंवा बौद्ध समाजालाच लागलेली किड आहे असे म्हणणे चुकिचे आहे. असा समाज दाखवा आणि हजारो, लाखो रूपये मिळवा, अशी जाहिरात दिली तरी असा एकही समाज भेटणार नाही की, जाती ब्राह्मण समाजात सुद्धा विभाजित प्रवृत्ती आहे.त्यामुळे आंबेडकरी समाजाला निव्वळ दोष देता येणार नाही.त्याचे मुख्य कारण व्यक्तीगत मनिषा, लोभ हे कारण असते की ज्यामुळे, सामाजिक ऐकीला तडा जातो. आणि व्यक्तीगत
लोभा बरोबर च,निव्वळ स्वार्थापेक्षा अधिकत्तम सामाजिक हित साधले जात असेल तर त्यात काही वावगेही नाही.
क्राॅग्रेस किंवा भाजपा ह्या एकाच नाण्याच्या बाजू आहेत.पण भरभक्कम भारतभर तिसरा पर्याय उपलब्ध ही नाही. आणि कदाचित याच कारणांस्तव आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्ताधारी जमात बना या कारणास्तव कदाचित, आणि एक भव्यदिव्य असा सर्वाना सोबत घेऊन
चालणार, सामाजिक दायित्व घेऊन, सर्वांना ऐकाच मंचावर बांधून ठेविल असा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रमाणे मोठ्या मनाचा सक्षम नेता नसल्याने, च नाहीपेक्षा बरा म्हणूनच
चढाओढ लागून, आंबेडकरी समाजाला भ्रमणावस्था लागलेली आहे.हे वास्तव नाकारून, कसे चालेल?
म्हणूनच, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन समाजाला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरी राष्ट्र विचाराला जोडत राहणे हे
महान कार्य च आहे.
अड.बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांचे बंधु म्हणजेच डाॅ.बाबासाहेब
आंबेडकर यांचे सर्व नातू हेच रिपब्लिकन पक्षात विभाजित आहे तर? समाजासाठी मोठेपणा नाही तर
समाजातील इतरात ऐकीची भावना कशी द्विगुणित होईल?
काँग्रेस पक्ष आणि भाजपा हे दोन्ही ही पक्ष आपआपल्या राजकीय सत्तेसाठी,
आपल्यात फुट पाडून आपले पात्र सजवित राहतात, आणि ते साहजिकही आहे.
त्याचे एकमेव कारण म्हणजेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्या प्रमाणे, निव्वळ आपल्या मतावर संपूर्णत: सत्तेत पोहचू शकत नाही,आणि आपल्या समविचाराच्या पक्षाची युती
करणे हाच एकमेव पर्याय आहे नव्हे; आज युतीचे राजकीय वारे भारतात नव्हे, तर जगात वाहत असतांना, “अकेला चलो” ची भूमिका, “मलाही नाही आणि तुलाही नाही, घाल कुत्राला “या म्हणी प्रमाणे, अयोग्य असल्याने,समविचाराच्या पक्षांना एकत्र करून “नवीन युती” चा पर्याय देणे किंवा उपलब्ध समविचारी पक्षासोबत युती करून, आपले घोडे, सत्तेत पोहचवून, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्या प्रमाणे सत्तेचा लाभ समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविणे हीच एकमेव राजकीय भूमिका, आंबेडकरी विचारवंत,आंबेडकरी राजकीय धुरंधर यांचे समोर आहे. असे माझे प्रामाणिक मत आहे.
🪷
प्रा.मुकुंद दखणे.
यवतमाळ 9373011954.
जयभीम 🙏🏾जयभारत
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत