हजारो वर्षांची गुलामी
एका क्षणात झिडकारली
तोदिन धम्म क्रांती
१४आक्टोबर१९५६
जगाच्या इतिहासात न घडलेली
रक्ताचा एक थेंब न सांडता
रक्त विहीन क्रांती
नागपूरच्या दीक्षाभूमीवर केली
देव देव्हाऱ्याच्या जोखडातून मुक्त करून परंपरेने पूजत आलेले देव
गावकुसाबाहेर फेकले
अंध श्रद्धा अंध विश्वास यांना
मूठमाती दिली.
अंधारातून प्रकाशाकडे
नवी झेप घेतली
नवी संस्कृतीच्या दिशेने
वाटचाल सुरू केली
समता स्वातंत्र्य मंत्र अंगिकारला
मनात नवी शक्ती संचारली
नवद्रूष्ट्री नवे तेज प्राप्त झाले
विषमतावादी व्यवस्था हादरली
अचेतन व्यवस्थेतून
चेतना निर्माण झाली
माणसाला माणूस म्हणून
जगण्याची स्फूर्ती आली
भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानाची
ओळख झाली
सनातन हिंदु धर्माच्या परंपरेला
नाकारुन नवा बुद्ध धम्म स्वीकारला
विनायकराव जयवंतराव जामगडे
९३७२४५६३८९
७८२३०९३५५६
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत