☸️ बुद्ध उपदेश ☸️
एकदा एक माणूस एका गावाजवळून जात होता. त्या वाटेवर एक स्मशानभूमी होते, स्मशानभूमीतील दगडांवर मृतव्यक्तीचे वय 5 वर्षे, 8 वर्षे, 10 वर्षे आणि 20 वर्षे लिहिलेले दिसले.
त्या माणसाला वाटले की या गावातील प्रत्येकजण कोवळ्या वयात मरतो. तो माणूस गावात गेल्यावर गावकऱ्यांनी त्या माणसाचा खूप सन्मान केला. त्या गावात काही दिवस राहिल्यानंतर तो माणूस निघायला तयार झाला आणि गावकऱ्यांना म्हणाला की उद्या निघतोय.
त्याचे बोलणे ऐकून गावकरी खूप दुःखी झाले आणि म्हणाले आमची काही चूक झाली असेल तर सांगा पण इथून जाऊ नका, याच गावात राहा. तो माणूस म्हणू लागला की या गावात मी जास्त काळ राहू शकत नाही, कारण या गावात एक माणूस लहानपणीच मरण पावतो.
त्याचे बोलणे ऐकून गावकरी हसायला लागले आणि म्हणाले, बघा – आमच्यातही 60 वर्षांचे 70 वर्षांचे आणि 85 वर्षांचे वृद्ध आहेत. तेव्हा त्या माणसाने विचारले की स्मशानभूमीच्या दगडांवर मृत व्यक्तीचे वय लिहिण्याचे कारण काय ?
गावकरी म्हणू लागले की,आमच्या गावात अशी प्रथा आहे की, माणूस दिवसभर काम करून, रोज रात्री बुद्ध वंदना करून, दिवसभरातील जनतेची सेवा करून, रात्री जेवल्यानंतर, झोपी जाण्या अगोदर आम्ही प्रत्येक जण लिहितो. त्याच्या आजच्या जीवनाचा दिनक्रम. लिहितो की आज किती वेळा भगवान बुद्धांच्या विचारांची आठवण केली, बुद्ध विहारांमध्ये जाऊन बौद्ध भन्तेजी व त्यांच्या सहकाऱ्यांना भोजन दिलं का ? घरी आल्यानंतर आई-वडिलांचे विचार अंगीकृत करून दिवसभर केलेली मेहनतीचे पैसे घरी आणून दिले का ? इत्यादी विषयांवर आम्ही चर्चा करत असतो.
ती व्यक्ती मरण पावल्यावर त्यांनी लिहिलेली दैनंदिनी घेऊन, त्यांनी केलेल्या कार्याचा कर्तव्याचा वेळेला जोडून आपण ते महिने आणि वर्षांमध्ये बनवतो आणि दगडांवर लिहितो. कारण “माणसाचे खरे वय तेच असते जे त्याने बुद्ध मार्गाने जाण्यासाठी घालवले असते,उरलेले मानवी जीवन जगात वाया गेले…..”
!जयभीम! !!जयभारत!! !!!नमोबुध्दाय!!!
🟦🟠🟦🟠🟦🟠🟦🟠🟦🟠🟦
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत