सिंह नावाचा इतिहास –
महाराष्ट्रातील विदर्भावरील मध्य भारतातील विद्य पर्वताच्या उत्तरेकडे हिंदी भाषीक पट्ट्यामध्ये तसेच हिमालयीन प्रदेशामध्ये पुरुषाच्या नावामागे सिंह किंवा सिंग लावण्याची प्राचिन परंपरा आहे. जसे मनमोहन सिंग, भगतसिंग, सुरजीतसिंग किंवा दरबारसिंह, राजेंद्रसिंह, गजेंद्रसिंह इ. सिंह नावाचा वापर भारतीय प्राचिन इतिहासामध्ये अतिशय महत्वपूर्ण केलेला आढळतो. सिंह या प्राण्याचा नावाशी इतिहासाचा संबंध जोडला असता प्राचिन भारतात अस्तित्वात असलेल्या काळ्या पाषाणातील बौध्द लेण्या, मंदिरे, प्राचिन तिर्थक्षेत्रे, पर्यटन स्थळे इ. ठिकाणी असलेल्या शिल्पामध्ये सुध्दा सिंहाच्या शिल्पास अतिशय महत्वाचे स्थान आहे. उदा. वैशाली येथील सिंह स्तंभ, भारताची राजमुद्रा अशोक स्तंभावरील सिंहाची मूर्ती, प्राचिन बौध्द लेण्यामध्ये असलेल्या सिंहाच्या विविध शैलीतील मूर्त्या, कोल्हापूर जिल्ह्यातील दत्ताचे प्राचिन मंदिर असलेले नरसोबाची वाडी, दशावतारातील नरसिंह आवतार होय. कित्येक प्राचिन भारतीय व परदेशी देव-देवतांचे वाहन हे सिंह दाखविले आहे.
नरसिंह गाथा त्रिपिटकातील एक महत्वाची गाथा आहे. नरसिंह गाथेमध्ये भगवान गौतम बुध्दांच्या व्यक्तीमत्वाची ओळख आहे. दिव्यज्ञान प्राप्त झाल्यानंतर जेव्हा गौतम बुध्द प्रथम शाक्यांची राजधानी कपिलवस्तू येथे येतात तेव्हा त्यांचे स्वागतास समस्त कपिलवस्तूकर जातात. परंतू, राणी यशोधरा आपले मुलगा राहूल यांचे समावेत राजप्रसादामध्ये असतात. तेव्हा राहूल यांस आपल्या पित्याची ओळख करुन देतांना राणी यशोधरा नरसिंह गाथेप्रमाणे तथागत भगवान गौतम बुध्दांची ओळख राहूल यास करुन देते. नरसिंह गाथेमध्ये तथागत भगवान गौतम बुध्दांच्या अंगी असलेले काया, रुप व गुणांचा समावेश आहे. अशाप्रकारे सिंह हे नाव तथागत भगवान गौतम बुध्दांच्या धम्माशी संबंधीत आहे. बुध्दवाणी किंवा उपदेशास सिंह नाद असे म्हटले जाते. आज जे सिंह हे बिरुद आपल्या नावाचे मागे जे लोक लावत आहेत ते सुध्दा धम्माचे प्रतिक आहे. जंम्बूद्विपातील अनेक देशामध्ये नागरीक आपले नावाचे मागे सिंह हे अभिमानाने व परंपरेने लावतात. ही परंपरा बौध्द धम्मातून आलेली आहे. सिंहली असे सिरीलंकेमधील नागरीकांची ओळख आहे. सिरीलंकेतील सिगिरीया या भागातील उंच पर्वतावर जी प्राचिन राजधानी आहे त्या पर्वतावर जाण्याची वाट सिंहस्थानावरुन जाते. भारतातील व जगातील बौध्द मॉनेस्ट्री मध्ये सिंहाचे शिल्प आसते. सिंहावलोकन करणे म्हणजे सम्यक स्मृतीने गत काळाच्या परिस्थितीवरुन वर्तमान काळ जाणने व भविष्यकाळाचा वेध घेणे होय. सिंहास जंगलाचा राजा म्हणतात. राजाच्या बसण्याच्या खुर्चीला सिंहासन म्हणतात. पराक्रमी शूर पुरुषाला सिंहाची उपमा देतात. प्राचिन काळा पासून राजाज्ञावर सिंहाची मोहोर असे. तथागत बुध्दांच्या वाणीस सिंहनाद म्हणतात. तथागत भगवान गौतम बुध्दांची अनेक नामापैकी शाक्यसिंह हे नाव त्रिपिटकामध्ये अनेक वेळा येते.
भारतामध्ये प्रत्येक शहरामध्ये शासकीय कार्यालयामध्ये अशोक स्तंभ उभारणे हीच जंम्बु्व्दिपातील महान ऐतिहासीक सम्राट अशोक यांना खरी मानवंदना होय.
घोडा, बैल म्हणजेच ऋषभ, हत्ती व सिंह हे बौध्द धम्माशी संबंधीत प्राणी आहेत कि जे त्यांच्या गुण विशिष्ठ्याप्रमाणे प्रसिध्द आहेत. त्यांचा अशोक राजचिन्हामध्ये समर्पकपणे उपयोग करण्यात आला आहे.
लेखक – सिरी अनिल जगताप, वानवडी, पुणे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत