दिनविशेष – शनिवार 1 जून 2024

आज दि. १ जून २०२४, बुद्धाब्द २५६८, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, सनिवारो, वेसाख मासो, शनिवार, वैशाख माहे.
१ जून १९६९ – रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी छ्त्रपती शिवाजीराजं भोसले यांचा पोवाडा हा ग्रंथ प्रकाशित केला.
१ जून १८७३ – रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी ग्रंथ प्रकाशित केला.
१ जून १९३६ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत अखिल मुंबई प्रांत महार परिषद जोडून संत परिषद घेण्यात आली. त्यावेळी सभामंडपात साधूंनी माळा होमकुंडात टाकून दिल्या व धंम्मांतराला पाठिंबा जाहीर केला.
१ जून १९३६ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकीय परिषदेपुढे केलेल्या भाषणात राजकीय सुधारणांबाबत माहिती दिली. तसेच आपल्या भाषणात सांगितले की, “कायदे मंडळावर पक्षाचा लायक उमेदवारच निवडून आणा.”
१ जून १९४२ – रोजी दुसऱ्या महार बटालियनची कामठी येथे स्थापना झाली.
१ जून १९५२ – रोजी कोलंबिया विद्यापीठाने बहाल केलेली एल. एल. डी. पदवी स्वीकारण्यासाठी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईहून विमानाने न्यूयॉर्कला पदवीदान समारंभासाठी प्रयाण.
*१ जून- *आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस.*
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत