भारतीय बौद्ध महासभा व बुद्धसृष्टी फाउंडेशन कळंब चा स्तुत्य उपक्रम – खास महिलांसाठी दहा दिवसीय निवासी बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.


धाराशिव : पूज्य भंते आर्या मेताजी यांच्या मार्गदर्शनात कळंब येथील बुध्दसृष्टी येथे अविरत पणे धम्म प्रचार आणि प्रसाराचे कार्य चालू आहे. महिला व मुलीं मध्ये धम्माप्रती आवड निर्माण व्हावी या हेतूने 13 मे ते 23 मे या दहा दिवसाच्या उन्हाळी सुट्टीत बुध्दजयंती निमित्ताने बुध्दधम्म संस्कार प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केलेले आहे.
बुध्दसृष्टी सोशल फाउंडेशन व भा. बो. महासभा तालुका शाखा, केज कळंब यांच्या वतीने आयोजित धम्मउपासिका बुध्दसंस्कृती संस्कार प्रशिक्षण शिबीर हे निवासी १० दिवसीय असेल.
दिनांक २३/०७/२०२४ रोजी बुध्दजयंती साजरी करुन शिबीरार्थीना प्रशिक्षण प्रमाणपत्र देऊन सन्मानीत केले जाईल.
शिबिराचे उद्घाटन केज नगर परिषद अध्यक्षा आयु. शिताताई बनसोड, सोनवळा महिला मंडळाच्या जयश्रीताई मस्के, आशाताई लक्ष्मण धावारे, अंजली गायकवाड, ढालमारे ताई केज पुष्पलता गपाट, प्रजकत्ता पाटील, प्रतिभा भवर, वर्षा जाधव इत्यादी मान्यवरांच्या उपस्थिती होणार आहे.
शिबिरार्थीना मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य संघटक आयु. शारदाताई गजभिये, उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष आयु. विजयमाला धावरे यांच्या सह सन्माननीय पदाधिकारी सुषमा ताई निकाळजे परांडा, पंचशलिा किरवले शिरसाळा, शीलाताई चंदनशीवे, मिना मेश्राम, मिना लगाडे, अनिता शिंद निकाळजे ताई परांडा इत्यादी उपस्थित असणार आहेत.
फक्त २७ महिला मुलीनां प्रवेश दिला जाईल त्यामुळे लवकरात लवकर आपली नावनोंदणी करावी ही आयोजकांच्या वतीने विनंती.
अधिक माहितीसाठी संपर्क:
शिबीराचे मुख्य आर्या मेताजी.9763627176
प्रशिक्षक विजयमाला धावरे.9850901130.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत