बोर्ड ही त्यांचे , पर्यवेक्षक ही त्यांचेच ,, निकाल देणारे ही तेच ,मग आत्ता निकालाची चर्चा तर कशासाठी करायची ?

हाण सख्या तुझीच बारी ,,,,
लोकशाही मेली तरी डेंगन्या मारी,,,,,
ऍड अविनाश टी काले , अकलूज , तालुका माळशिरस , जिल्हा सोलापूर
मो न :-9960178213
आत्ताच 12वी चे निकाल लागले आहेत , त्यात कांहीं बोर्डात गुणवत्ता यादीत आले आहेत , आणि कांहीं नापास ही झाले आहेत
गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी काय करतात ? तर ते त्यांच्या विद्यार्थी दशेस प्रामाणिक असतात , दररोज शाळेत जातात , होम वर्क करतात , प्रश्न पत्रिका सोडवण्याचा अभ्यास ही करता त .
याच्या उलट एक दुसरे टोक असते , ते अभ्यास करत नाहीत , वर्षभर चंगळ वादी राहतात , आणि परीक्षा जवळ आली की अतिशय गंभीर विद्यार्थी बनून अपेक्षित प्रश्न संचाची उत्तरे वाचत राहतात .
त्याचे ही पुढचा अजून एक वर्ग असतो , तो आधीही अभ्यास करत नाही , शेवट च्या काळात ही करत नाही पण परीक्षेच्या आदल्या रात्री तो डेस्क वर बसून बारीक अक्षरात कागदाच्या कपट्या वर उत्तरे लिहीत राहतो ,,,
ते कपटे कुठे ठेवायचे ? याचा अंदाज वेगेवेगळा असतो ,, आणि परीक्षा हॉल मध्ये गेले की , ती उत्तरे बाहेर निघतात , उत्तर पत्रिकेवर उतरवली जातात आणि असा विद्यार्थी ही पास होतो .
जगाच्या दृष्टीने तो धक्का असतो आणि त्या विद्यार्थ्या साठी ती कुशलता असते ,
मातंग समाजाची सांकेतिक भाषा आहे यात तिला “वाय ” म्हणतात , ही वाय म्हणजे चलाखी ,, शाळा ,,,
पर्यवेक्षकाच्या डोळ्यात धूळफेक करण्याची कला म्हणजे कॉपी,,,,,
आत्ता समग्र देशातील केंद्रीय पातळीवरील सत्ता निर्मिती साठी परीक्षा घेतली जात आहे ,
या परीक्षेसाठी स्वतः ला सिद्ध करण्यासाठी जवळपास 4000किलो मिटर ची पदयात्रा काढून जनतेशी संवाद साधणारे राहुल गांधी परीक्षेसाठी बसले आहेत ,
अश्याच समर्पित नेत्यांना एकत्रित करून त्यांनी I N D IYA नावाचा ग्रुप काढला , कांहीं पेपर ही झाले आहेत , अजून एक दोन राहिले आहेत .
निकालाचे पेपर गोडाऊन मध्ये बंद आहेत , ते बंद होण्या पूर्वी पुरवण्या जोडलेल्या ची ही आकडेवारी होती ,
पण अचानक या गठ्ठ्यातील कांहीं उत्तर पत्रिकेला बाहेरून आत घुसून पुरवणी उत्तर पत्रिका जोडल्या आहेत , असा प्रकार नगर जिल्ह्यात निलेश लंके यांच्या मतदार संघात घडला , आणि असे प्रकार रोखण्यासाठी सह्या असलेले कागद तोडून लॉक तोडले गेले आहेत.
निवडणूक आयोग रुपी बोर्ड असताना ही एटा सारख्या भागात एक व्यक्ती एक मार्क न देता 8 मार्क देऊन गेला ,,,
देश भरातुन अशी एक कोटी मार्क अधिक ची वाढवण्यात आली आहेत , आणि प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्यांना विचारले जात आहे ,,, आहे का तुमच्यात हिंमत? माझे मार्क रोखण्याची?
बोर्ड ही त्यांचे , पर्यवेक्षक ही त्यांचेच ,, निकाल देणारे ही तेच ,
मग आत्ता निकालाची चर्चा तर कशासाठी करायची ?
मी ज्या तालुक्यात राहतो तो माळशिरस तालुका , इथे एकमेकाशी भांडण करणारे दोन विद्यार्थी एक झाले ,, सगळे चिंतेत पडले ,, आत्ता समोर कोणीच नव्हते , पण एक
चिरगुट बुजगावणे उभे केले ,,
आत्ता त्याचा सत्कार कॉपी गटाच्या प्रमुखाने केला आहे , आणि मजबुतीने काम केले म्हणून शबासकीची थाप पाठीवर टाकली आहे ,,,
हे घडत राहील , घडले आहे ,, प्रश्न त्यांना आहे जे परीक्षार्थी म्हणून या परीक्षेस बसले आहेत ,
आम्ही ना परीक्षार्थी आहोत , ना आमची यात कोणती भूमिका आहे ,
त्या परीक्षार्थी ना आम्ही सवाल केला आहे
“ते लाज , शरम सोडून सार कांहीं उघडपणे करत राहतील , याला रोखण्याचे तुमच्या कडे पर्याय काय आहेत?
फक्त रडणार असाल तर हे रडणे व्यर्थं आहे ,,,, अरण्य रुदन आहे ते ,,,, अरण्य किंवा जंगलात टाहो फोडून रडले तरी उपयोग होत नाही ,,,,
या शिवाय दुसरा मार्ग आहे काय?
नसेल तर पौरुष्यत्वहिन आहोत असे जाहीर करून सगळेच थंड बसू ,,,,,,
नामदेव ढसाळ यांच्या भाषेत
“हाण सख्या तुझीच बारी,,,,,,
,,,,,,,लोकशाही मेली तर डेंगन्या मारी,,,,,
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत