संपूर्ण ब्राह्मण कोण?
प्रा.मुकुंद दखणे.
मगध सम्राट बिंबिसार यांचे दरबारात
बुद्ध आणि सोमदंड यामध्ये झालेला वाद विवादात,भगवान बुद्ध सोमदंडाला प्रश्न करतात की,
चांगला, पूर्ण ब्राह्मण होण्यास कोणते गुण आवश्यक आहे?
या भगवान बुद्धाच्या प्रश्नास सोमदंड जातीने ब्राह्मण उत्तर देतो की, त्या व्यक्ती जवळ पाचं गुण विकसीत होणे आवश्यक आहे.
1]सुंदर रूप 2]सात पिढी तील रक्त शुद्धी 3]वैदिकअनुष्ठान,मंत्रोच्चार]विवेकी,ज्ञान आणि 5] चांगले कर्म.
भगवान बुद्ध पुढे विचारतात की, या पैकी कोणते दोन महत्त्वपूर्ण गुण विकसीत होणे अनिवार्य आहे.की मनुष्यात चांगला संपूर्ण ब्राह्मण विकसीत होईल. त्यावर सोमदंड जाती ब्राह्मण मार्मिक उत्तर देतात की, चांगले ज्ञान
आणि चांगले कर्म हे दोन गुण चांगला,संपूर्ण ब्राह्मण विकसीत होण्यासाठी आवश्यक आहे.
बुद्ध पुन्हा प्रश्न उपस्थित करतात की, या दोन गुणां पैकी कोणता महत्त्वपूर्ण गुण अधिक महत्त्वपूर्ण आहे.
तेव्हा सोमदंड उत्तर देतो की, हे दोन्ही गुण एकमेकांवर अवलंबून आहे. चांगल ज्ञान असल्या शिवाय चांगले कर्म निर्माण होत नाही आणि चांगले कर्म
हेच चांगले ज्ञान उत्पन्नाचे साधन आहे. आणि दोन गुण सद्धकर्म आणि सुविचार हे ज्याचे जवळ आहे तोच चांगला,संपूर्ण ब्राह्मण बनण्यास पात्र आहे.
भगवान बुद्धाच्या पुढचा प्रश्न की, या दोन गुणांपैकी कोणता गुण अधिक महत्त्वपूर्ण आहे.सोमदंड शतप्रतीशत बरोबर उत्तरतांना सांगतात की, सद्कर्म व ज्ञान हे दोन होऊ शकत नाही. जसे दोन हात आणि दोन पाय वेगळे होऊ शकत नाही. एकमेकास पुरक आहेत, त्या प्रमाणेच ज्ञान आणि कर्म एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
त्याचे राजा बिंबिसार आणि सभागृहातील उपस्थित सर्व सोमदंडाची वाह वाह करतात, अभिनंदन करतात. ते म्हणतात की ,सद्कर्म विवेक जागृत करीत असतो आणि सद्बुद्धी ने,विवेकाने चांगले कर्म, आणि धार्मिकता निर्माण होत राहत असते.आणि म्हणूनच सद्कर्म आणि उत्तम ज्ञान हेच जीवनाचे महामंत्र,महान गुण होय.
या अतिउत्तम उत्तरावर राजा बिंबिसार बुद्धाला विचारतात की, सोमदंडा कडून आपणास अधिक काय अपेक्षित आहे.? तेव्हा भगवान बुद्ध विचारतात की, सद्कर्म आणि ज्ञान या उच्चतम गुणाला कसे विकसीत करता येईल?
सदर प्रश्नानी सोमदंड मात्र गडबडतो कारण वैदिक ज्ञान फक्त जाती ब्राह्मणी मंत्रोच्चाराला ज्ञान विज्ञान समजतात पण अनुभूती च्या पाठीवर ते टिकत नाही. आणि सोमदंड उत्तर देण्यास असमर्थ ठरतात व भगवान बुद्धा कडून मार्गदर्शनाची हात जोडून अपेक्षा करतात. कारण भगवान बुद्ध ज्ञानाला ज्ञान तेव्हाच मानतात जेव्हा असे ज्ञान सत्याच्या कसोटीवर उतरते .जमिनीवर अनुभव दर्शक ठरते. बुद्ध परम् ज्ञान त्यास मानतात जे सहा इंद्रियाच्या कसोटीवर उतरते. अनुभूती देते. भगवान बुद्धाच्या मते धर्म हा मानवी सातवे इंद्रीय होय. आणि हे सातही इंद्र ज्या व्यक्तीला प्राप्त असतात. त्यास भगवान बुद्ध संपूर्ण ब्राह्मण मानतात. हात जोडून तुम्हीच सांगावे की, ज्ञान आणि सद्कर्म कसे विकसीत करता येतात?
सोमदंडाच्या या प्रतिप्रश्नणास परम् सत्यवान भगवान बुद्ध सांगतात की, आत्ममुक्तीचे तीन चरण आहेत.1]ध्यान 2]ज्ञान आणि 3]शिलाचरण. जर शीलाचरण चांगले असेल तर ध्यान लागते आणि ध्यानातून, ज्ञानाची वृद्धी होत राहुन शीलाचरण सुधारून,लोभ, मोह, माया, मत्सर, द्वेष, अंहकार आदि तृष्णामुक्त मनुष्य होऊन आनंदी आणि सुखी बनुन मनुष्य खरा धार्मिक आणि संपूर्ण ब्राह्मण बनु शकतो. यालाच आत्मज्ञान असे म्हणतात आणि तोच मुक्ती चा मोक्षाचा उत्तम मार्ग होय.
म्हणूनच,मोक्षाचा मार्ग हा धार्मिक कर्मकांड, प्रार्थना, पुजा पाठ नसून
किंवा मंदीरात प्रदर्शना करणे नसून
किंवा देवपुजा नसून, ध्यान साधनाच्या सहाय्याने ज्ञान प्राप्त करून तृष्णामुक्त होऊन, शीलाचरण
सुधारणे हीच खरी धार्मिकता होय.
आणि त्याची विशुद्ध प्रचीती,अनुभूती म्हणजे
आत्मज्ञान किंवा विज्ञान होय.
🪷
प्रा.मुकुंद दखणे.
यवतमाळ 9373011954.
जयभीम 🙏🏾जयभारत
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत