महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

विशाळगड दंगलीवर ‘मविआ’ गप्प !

मुस्लिमांनो, तुमच्या संरक्षणासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीवाले येत नाहीत हे समजून घ्या.

लोकसभा निवडणुकीत संविधान बचाव घोषणेच्या आडून महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने मुस्लिम, दलित, आदिवासी बहुजन समाजाची मते घेतली. बहुजन समाजाने देखील त्यांना भरभरून मते दिली आणि त्यामुळेच त्यांचा विजय झाला. मात्र, मुस्लिम, दलित, ओबीसी, आदिवासी बहुजन समाज जेव्हा अडचणीत असतो. त्यांच्यावर जातीवादी, धर्मांध फॅसिस्ट शक्ती एकतर्फी हल्ला करतात, तेंव्हा ना महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना येते, ना भाजप येते. भाजप तर मुस्लिम, दलित, आदिवासी, ओबीसी समाजाला आपला दुश्मन समजते. पण हे सगळेच पक्ष धर्मनिरपेक्षतेचे सोंग घेवून बहुजनांच्या मतांसाठी ढोंग करतात.

वंचित बहुजन आघाडी आणि ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते आहेत, ज्यांना या मुस्लिम, दलित, आदिवासी, ओबीसी आणि गरीब मराठा समाजाने मते दिली नाहीत, तरी ते स्पष्ट आणि ठाम भूमिका घेऊन या सर्व समुहांच्यासोबत खंबीरपणे उभे राहतात. जे लोक वंचितला भाजपची बी टीम म्हणून कलंकित करण्याचा प्रयत्न करतात ते स्वतःच भाजपची ए टीम असतात हे बहुजन समाजाला समजायला वेळ लागतो. तेवढ्या वेळेत ते आपला डाव साधून घेतात. आज मुस्लिम, दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजांना टार्गेट करून धर्मांध फॅसिस्ट शक्ती खुलेआम देशाची आणि राज्याचे बहुसांस्कृतिक धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी रचनाच उदध्वस्त करू लागली आहे. हिंदू मुस्लिम द्वेष वाढवून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम भाजप आणि आरएसएसचा छुपा अजेंडा चालवणाऱ्या त्यांच्याच शाखा यात तेल ओतण्याचे काम करीत आहेत. विशाळगड येथील दंगल हा त्याचाच भाग आहे. भीमा कोरेगाव दंगलीतील मुख्य आरोपी मनोहर भिडे कुलकर्णी यांचे धारकरी कुणाच्या पाठिंब्याने विशाळगडावर हैदोस घालत होते हे महाराष्ट्रातील सुज्ञ जनता ओळखते. महाविकास आघाडीतील घटक पक्ष यावर एक अक्षर बोलायला तयार नाहीत. केवळ मतांसाठी ते बहुजन समाजाला गोंजारत राहतात हे जर मुस्लिमांनी ओळखले असेल तर भाजप आरएसएस आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांची चाल ओळखा आणि ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना साथ द्या. तुमच्या संरक्षणासाठी कालही आंबेडकर होते आणि आजही आंबेडकर आहेत, उद्याही आंबेडकर असतील हे समजून घ्या.

गेल्या वर्षी पुसेसावळी सातारा येथे घडवून आणलेली दंगल असो किंवा आता विशाळगड येथे घडवलेली दंगल असो. सातत्याने मुस्लिम द्वेष पसरवण्याचे काम धर्मांध संघटनांकडून करण्यात आले आहे. मात्र, यात कुठेही महाविकास आघाडीने कोणतीही ठोस भूमिका घेतल्याचे दिसले नाही. मुस्लिम समाज एकटा पडला आहे. भयभीत झाला आहे. मुस्लिम, दलित, आदिवासी, भटके विमुक्त, जैन, लिंगायत, गरीब मराठा आणि ओबीसी समाजांच्या बाजूने स्पष्ट भूमिका घेवून आज फक्त ॲड. बाळासाहेब आंबेडकर उभे आहेत. आगामी निवडणुकीत आता आपण कुणाच्या बाजूने उभे राहायचे याचा निर्णय आताच घेऊन ठेवा. जातीवादी, धर्मांध शक्तीला जशास तसे उत्तर देण्याची हिंमत फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्यात आहे. त्यांना तुम्ही लोकसभा निवडणुकीत साथ दिली नसली तरी ते मात्र तुमच्यासाठी आजही मैदानात उतरायला तयार आहेत. त्यामुळे आपल्यासाठी धावून येणारा नेता कोण हे ओळखा आणि संविधानाने इथल्या प्रत्येकाला स्वाभिमानाने विचार, व्यवहार आणि व्यवसाय, आचरण करण्याचा अधिकार दिला आहे. आपला देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालतो. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जशी पोलिसांची आहे, तशीच ती जबाबदार नागरिक म्हणून आपली सगळ्यांची आहे. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांचा वारसा असलेल्या कोल्हापूर करवीर नगरीची शांतता कायम ठेवूया..!

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!