ग्रॅन्ड डफने लिहिला शिवाजी महाराजांचा इतिहास
क्रांतीसूर्य जोतीराव फुले ज्या इंग्रजी सत्तेला मायबाप म्हणत असत, त्या इंग्रजी सत्तेमधील एक इंग्रज अधिकारी (James Cunningham Grant Duff ) ग्रॅन्ड डफ हा एक इतिहासाचा अभ्यासक आणि संशोधक म्हणून प्रसिद्ध होता. ग्रॅन्ड डफ याने संबंध मराठ्यांचाच इतिहास लिहिला होता.
इंग्रजांची सत्ता भारतात आल्यानंतर त्यांनी पाहिले कि, देशभरातील केवळ ब्राम्हणच शिक्षण घेत आहेत. ब्राम्हणांचे शिक्षण म्हणजे केवळ वेदपठण. हे वेदपठण त्यांच्या वेदशाळेत चालत असे. अशा वेदशाळा भारतभर सुरु होत्या. आजही आहेत. (पुणे, मुंबई, नरसोबावाडी, औदुंबर या ठिकाणी मी स्वतः पाहिल्या आहेत.) या वेदशाळेत ब्राम्हणेत्तर वर्गाला प्रवेश नाही. अनुसुचित जाती जमातीच्या लोकांचा तर प्रश्नच उद्भवत नव्हता. हे सगळे पाहून इंग्रजांनी सर्व भारतीयांच्यासाठी शिक्षण सुरु केले. मुंबई -दिल्ली- मद्रास आणि कलकत्ता या ठिकाणी इंग्रजांनी University काढल्या ; College नव्हे, University !
देशभरातील ब्राम्हणेत्तर वर्ग हळूहळू शिक्षण घेऊ लागला. तर दुसरीकडे, ब्राम्हण वर्गात इंग्रजी सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण झाला. ब्राम्हणेत्तर वर्ग शिक्षण घेतो आहे हे ब्राम्हणाच्या धर्माविरुद्ध होते.
याच इंग्रजी शाळेत जोतीराव फुले यांनी शिक्षण घेतले. शिकलेल्या जोतीराव फुले यांनी ग्रॅन्ड डफने लिहिलेला इतिहास वाचला आणि ते आश्चर्याने थक्क झाले. कारण, ग्रॅन्ड डफने शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिला होता. तो इतिहास जोतीरावांनी वाचला आणि ते थक्क झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडावर आहे हे जोतीरावांना ग्रॅन्ड डफने लिहिलेला इतिहास वाचून समजले. तोपर्यंत शिवाजी महाराजांची समाधी रायगडावर आहे याची माहिती कोणालाच नव्हती. याचा अर्थ असा कि, शिवाजी महाराजांच्या निधनानंतर जवळपास दोनशे वर्षे, शिवाजी महाराजांच्या विषयी कोणालाही माहिती नव्हती. शिवाजी महाराजांना लोक पूर्णपणे विसरूनच गेले होते. जर तशी माहिती असती तर, शिवाजी महाराजांची समाधी दुर्लक्षित राहिली नसती.
ग्रॅन्ड डफने लिहिलेला इतिहास वाचून जोतीरावांना समजले कि, छत्रपती शिवाजी महाराज नावाचा एक फार मोठा राजा होऊन गेला आहे. आणि त्यांची समाधी रायगडावर आहे. म्हणून ते रायगडावर गेले आणि त्यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली.
जोतीरावांनी शिवाजी महाराजांची समाधी केवळ शोधून काढली असे नव्हे तर, ती धुऊन काढली. आजूबाजूची झुडपे तोडून समाधी जवळची जागा साफ केली. समाधीला फुले वाहिली.
हे सगळे तिथल्या ग्राम जोश्याला अर्थात ( विदेशी भटुकड्याला ) समजले. तावातावाने तो गडावर आला आणि त्याने समाधीवरील फुले लाथेने उडवली.
रागाने लालबुंद झालेला जोशी ब्राम्हण जोतीरावांना म्हणाला, अरे, मी असताना या शूद्राचा तू देव केलास ?
सारांश :
१. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर जवळपास दोनशे वर्षांनी, क्रांतिसूर्य जोतीराव फुले यांनी रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली.
२. या दोनशे वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांना लोक पूर्णपणे विसरून गेले होते.
३. ग्रॅन्ड डफने लिहिलेला इतिहास जोतीराव फुले यांनी वाचला म्हणून त्यांना समजले कि, शिवाजी महाराजांची समाधी रायगडावर आहे.
४. जोतीराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली तेव्हा ब्राम्हण जोशी तेथे आला आणि त्याने शिवाजी महाराजांना शूद्र संबोधले. एवढेच नव्हे तर, त्याने समाधीवरील फुले लाथेने उधळली.
५. टिळक नावाच्या ब्राह्मणाने शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली असे विदेशी ब्राह्मण भागवत जाणूनबुजून खोटे सांगतो आहे.
६. विदेशी ब्राह्मण समाजात भ्रम निर्माण करतात. समाजात दंगली आणि हिंसा घडवून आणतात.
भय, भ्रम आणि हिंसा यावरच तर ब्राम्हणांचे साम्राज्य उभे राहिले आहे !
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत