प्रकाश वाटा
अनिता झोडापे
सखे. शोध तुझ्या तुच प्रकाश वाटा
सांग त्या समाजाला
सांग त्या नराधमांना
स़ाग त्या सोंगाड्यांना
स्त्री म्हणजे काय आहे,
स्त्री आहे म्हणुनच तु आहेस,
म्हणुनच तु समाजाचा हिस्सा आहेस.
म्हणुनच म्हणते ..
सखे, शोध तुच तुझ्या प्रकाश वाटा
हुंडाबळी झालेत
बलात्कार ही झालेत
नग्न धींदोंडेही निघालेत
अजुन काय बाकी राहीलेत
स्त्रीयांचे हक्क, सामाजिक एकता
समजावुन बघ जरा
संवीधानाची पानेही उलगडुन दे जरा.
म्हणुनच म्हणते..
सखे, शोध तुच तुझ्या प्रकाश वाटा
आयुष्य खुप सुंदर आहे
सांग उलगडुन सर्वांना
देशाचा विकासाला
राष्ट्रीय एकात्मतेला
दुश्कर्म नाही तर सुकर्म करा
त्यासाठी तुझा आणि माझा हात बळकट हवा.
म्हणुनच म्हणते..
सखे, शोध तुच तुझ्या प्रकाश वाटा
सांग त्या समाजाला
कामवासनेत रमण्यापेक्षा
विद्याभ्यसात रमा,
हीच आहे खरी श्रेष्ठता
त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे
शिलवान बना..
मीच आहे माझा शील्पकार ओरडुन सांग जगाला.
म्हणुनच म्हणते..
सखे, शोध तुच तुझ्या प्रकाश वाटा.
सखे,शोध तुच तुझ्या प्रकाश वाटा.
अनिता झोडापे
खारघर, नवी मुंबई
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत