गणेश चतुर्थी आहे काय?
अशोक तुळशीराम भवरे
गणेश चतुर्थी आहे काय? गणेशाची पुणयतिथी आहे की जन्मदिवस याचा गणेश भक्तांना पत्ताच नाही पण बाळ गंगाधर टिळकांना चांगलेच महिती आहे की गणपतीचा जन्म माघ महिनयात झाला तरी बाळ गंगाधर टिळकांनी भाद्रपदमध्ये अचानक गणेश उत्सव साजरा करण्याचे कारण काय?
क्रांतीबा जोतिबा फुलेंनी १८६९ ला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शोध घेण्यासाठी गेले. त्यांना शिवरायांची समाधी दिसली घनदाट काटेरी झाडीमध्ये समाधी होती. कार्यकर्त्यांना घेऊन झाडीझुडपे तोडले, साफ केले, स्वच्छ पाण्याने धुतले, फुले वाहिली, पुजा केली शिवाजी राजांना पदवी दिली कुळवडी भुषण म्हणजे शेतकऱ्यांचा राजा. पण गावातला ग्रामजोशी ब्राम्हणांना घेऊन आला शिवरायांच्या समाधीवर फुले वाहिली होती ती लाथेनी उडवून टाकली व म्हणाला कायरे शुद्रा आम्ही ब्राम्हण श्रेष्ठ असताना या कुणबटाची पुजा करतोस. हा अपमान क्रांतीबा जोतिबा फुलेंना सहन झाला नाही. म्हणून सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांना क्रांतीबा जोतिबा फुलेंनी आदेश दिला संपूर्ण महाराष्ट्रात दहा दिवस शिवाजी महाराजांची जयंती साजरी करा, शिव उत्सव साजरा करा
पुण्यातुन या शिवजयंती उत्सवाला सुरूवात झाली. महाराष्ट्रात कुणबी, मराठा शिवजयंती साजरी करू लागला. महाराष्ट्रातल्या शुद्र अतिशूद्र क्रांतीबा जोतीबा फुलेंना आपले गुरू मानायला लागले. सत्यशोधक समाज चळवळीत सर्व समाज एकवटला क्रांतीबा जोतिबा फुलेंच्या नेतृत्वात. याचा फायदा सत्यशोधक समाज चळवळीत दोन लाख आठरा हजार सहाशे आठरा सदस्य लोक झाले.
तेव्हा काँग्रेसची सदस्य संख्या एक हजाराच्या आतमध्येच होती. याचा अर्थ क्रांतीबा जोतिबा फुले हे शुद्र अतिशूद्रांची समाजिक, राजकीय चळवळ उभी करून बहुजन समाजाला सत्तेवर आनायचा पक्का आजेंडा रचला होता यात शंका नाही. खरे शिवाजी महाराजांचे रयते राज्य आनणार यात शंका अजिबात नव्हतीच.
यावर पुण्यात टिळकांच्या नेतृत्वात सर्व पेशवे ब्राम्हण एकवटले आणि जोतिबा फुलेंचे आंदोलन काउंटर कसे करायचे याचा निर्णय घेतला. व पेशव्यांच्या शिनिवार वाड्यातला गणपती रस्त्यावर आनला दहा दिवस गणपती उत्सव १८८५ ला सुरू केला. मराठा, कुणबी, बहुजन समाजाला भक्ती मार्गात आनण्यासाठी भजन, किर्तन, पोवाडे, जाग्रुती जथ्थे, जलसे, पेपर, रेडिओ, कलापथके यातून गणपती देव तुमची सगळी संकट दुर करेल अशी भोळ्या भाबड्या जनतेच्या डोक्यात या माध्यमातून भक्ती मार्ग घुसवला. सगळा प्रचार माध्यम टिळका भोवती आणि भटकुड्यांवाटला प्रचार करत होता. आणि क्रांतीबा जोतीबा फुलेंच्या चळवळीचा प्रचार फक्त मौखिक होता.
साहजिकच आहे ब्राम्हण म्हणाले दगडाचा गणपती दुध पितो तर सर्व प्रचार माध्यम पेपर, टिव्ही चँनल तेच प्रचार करतात गणपती दुध पितो.
अशा प्रकारे टिळकाने शिवजयंती गिळंकृत केली, क्रांतीबा जोतिबा फुलेंचे आंदोलन कमजोर केले कारण जोतिबा फुलेसुद्धा त्यादरम्यान खुप आजारीसुद्धा होते. जर आजारी नसते तर बाकी सत्यशोधक चळवळीने महाराष्ट्रात सामाजिक, राजकीय इतिहास घडवलाच असता. आणि काल्पनिक गणेशोत्सव सुरू झाला नसता.
आता आपण गणपती कसा बनला म्हणतात पारवतीने आपल्या मलापासून गणपती बनवला ती घरी एकटी होती तीला भीती वाटत होती म्हणून तीचे संरक्षण करण्यासाठी गणपती तयार केला. गणपतीला दरवाजात उभे केले सांगितले मी आंघोळ घेईपर्यंत कोणालाही आत सोडायचे नाही. मग शंकर येतो गणपती त्याला अडवतो म्हणून त्याला क्रोध येतो त्रिशूळ मारतो मुंडक कापतो. पार्वती येते आकाश पाताळ एक करते, आक्रोश करते, तांडव करते माझा मुलागा मला जिवंत करून द्या नाहीतर या धरतीला शाप देईन की धरतीवर कोणी जीव जिवंत राहणार नाही. शंकर घाबरला त्रिशूळ हवेत फेकले आणि पहिला ज्या प्राण्याला त्रीशुल लागेल त्याचे मुंडके ते त्रिशळ आनेल ते मुंडके मृत गणपतीला लावले जाईल अशा प्रकारे गणपती जिवंत झाला.
अशी मनगडत कहाणी रचलेली आहे.
आता सांगा मित्रांनो हे खरे आहेकाय? गौरी ही शिवपुराणात गणपतीची बहिणसुद्धा दाखवतात, बायको सुद्धा गौरी गावाला पावसाळ्यात तिरड्याचे रोपट असते त्याला हिंदू लोक आनतात त्याला मोळी बांधतात त्याला कोणत्यातरी देवीचा मुखवटा लावतात झाली गौरी. विसर्जन करताना गौरीचा मुखवटा काढुन घेतात आणि दिड दिवसात तिरड्याच्या मुळीचे विसर्जन करतात.
ही मनगडत कहाणी आहे. मग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बत्तीस डिग्री पास केलेले, जगाचा अभ्यास केलेले, कोणतीही बाब संशोधनाअंती कसोटीवर पारखुन बघूनच ते लेखाद्वारे, आपल्याला बौद्धांना सांगत व २२ प्रतिज्ञापैकी तिसरी प्रतिज्ञा दिलेले आहे की गौरी-गणपती इत्यादी कोणत्याही देव देवतेस मानणार नाही त्यांची उपासना करणार नाही. बौद्ध तरूण-तरूणींनो तुम्ही लालबागचा राजाला जाता, नवसाचा गाणतीला जाता, गणपती मंडळाला भेटी द्यायला जाता, नवरात्रोत्सवात बिना चप्पल जाता, कोजागिरी पौर्णिमेलाला गरडा खेळायला जाता, होळी खेळायला जाता, धुळीवंदन खेळायला जाता, संक्रांतीला हळदीकुंकू साजरा करता, दहिहंडी फोडायला जाता, हिंदू सणांत बँनर लावून गणपती तुमचे फोटो लावून सुभेच्छा देता पण तुम्हाला महिती आहेका हे सगळे सन आपल्या राजा महापुरूषांची हत्या करून ब्राम्हणांनी आनंदोत्सव म्हणून उत्सव साजरा केलेले आहेत.
मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्हाला माणसात आणले बाबासाहेबांनी, शिक्षणाचे दरवाजे उघडले बाबासाहेबांनी, आज डिग्री घेतलीत बाबासाहेबांमुळे, लाखो रूपये पगार घेताय बाबासाहेबांमुळे मग यापैकी गणपतीने किंवा हिंदू देव-देवीने तुमच्यासाठी काय काय केलेले आहे सांगा?
प्रत्येक बौद्ध संस्थांनी, बौद्धजन पंचायत समितीने, बौद्धमहा सभा, तरूण, तरूणींनी, बौद्ध मित्रमंडळांनी, गणपती उत्सवात जाऊ नये यासाठी प्रत्येक बौद्ध संस्थांच्या अध्यक्ष/सेक्रेटरी पधादिकारी, भिख्खू बौद्धाचार्य, यांनी आपआपल्या संस्थेच्या कार्यकर्ते/सभासदांना आदेश
द्यायला पाहिजे की हिंदू धर्माच्या कोणत्याही देव-देवी उत्सवांना जाऊ नये हि जागृती आपण केली पाहिजे.
अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत