सौर ऊर्जेवर चालणारी वातानुकूलित ७५ नाट्यगृहं उभारणार-सुधीर मुनगंटीवार

या नाट्यसंमेलनाचा मुहूर्तमेढ सोहळा काल सांगलीतल्या विष्णुदास भावे नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी मुनगंटीवार बोलत होते. १०० व्या अखिल भारतिय मराठी नाट्य संमेलनासाठी शासनानं ९ कोटी ३३ लाख रूपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला असून, या माध्यमातून जिल्हास्तरावर नाट्यसंस्कृती जोपासली जावी अशी अपेक्षा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. नाट्य रसिकांना अल्प दरात नाटकाचे प्रयोग बघता यावेत यासाठी, राज्यात सौर ऊर्जेवर चालणारी वातानुकूलित ७५ नाट्यगृहं उभी केली जाणार आहेत, अशी घोषणा मुनगंटीवार यांनी यावेळी केली. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी,१०० व्या नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत