बदलापूर,लैंगिक शोषण प्रकरणी “राजकारण” करणे निर्ल्लजपणाचे लक्षण होय !
विजय अशोक बनसोडे
भौतिक दृष्ट्या प्रगल्भ असलेल्या बदलापूरमध्ये काही दिवसांपूर्वी दोन मुलींचं लैंगिक शोषण करण्यात आल्याची घटना घडली,या प्रकरणाचा विस्फोट मात्र आता सगळीकडे होताना दिसत आहे.अवघे चार वर्षे पूर्ण नसलेल्या मुलींचं लैंगिक शोषण ज्या शाळेत करण्यात आले,ती “आदर्श” नावाची संस्था भारतीय जनता पार्टीच्या जनकल्याण समितीच्या जिल्हा अध्यक्षाची आहे.तर मग समोर आलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण होणार नाही का ?
इथं “आदर्श” नावातच अनैतिक वर्तुणुकीची बीजं पेरली आहेत का!
खरं तर या पुरोगामी महाराष्ट्राला “आदर्श” नावाचा कलंक आणि अभिशापच लागलेला आहे.या महाराष्ट्रामध्ये आदर्श नाव घेऊन सगळ्यात मोठी बेकायदेशीर आणि अनैतिक कामं करण्यात येतात,ही वास्तविकता आता लपून राहिलेली नाही.खरं तर आशा “आदर्श” नावाचा वापर करणाऱ्या मंडळींना सुद्धा महादर्शच म्हटलं पाहिजे.
राजकारणामुळं मुलींना न्याय मिळण्याच्या प्रक्रियेचं काय होईल,याची सुद्धा चिंता आहे !
ज्या आदर्श संस्थेत पुरोगामी महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला काळीमा फासणारी घटना घडली.त्या घटनेची फिर्याद घेण्यास जवळपास 12 तास लागले होते.हा सुद्धा महाराष्ट्र पोलिसांचा प्रचंड मोठा “आदर्शच” आहे बरका…… ज्या पीडित दोन मुली पैकी एका मुलीची आई गरोदर असतानाही पोलीस स्टेशन त्याची दखल घेत नव्हते.यामुळे असा प्रश्न पडत होता की,ही शाळा नेमकं आहे कुणाची ? या शाळेचे मालक आहेत तरी कोण ? या प्रकरणात धुरंधर राजकारणी,जाणते राजे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला याची दखल घ्यावी लागते,म्हणजे नेमकं काय अनेक प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित झाले होते. त्यातच या लैंगिक शोषण प्रकरणावरून महाराष्ट्रातील धुरंदर नेत्यांमध्ये राजकारणाची स्पर्धा सुरू झाली. विविध संस्थांना शाळांना हाताशी धरून मोठ मोठे मूक मोर्चा सुरू झाले.इतकच काय तर 24 ऑगस्ट 2024 ला महाराष्ट्र बंदची हाक सुद्धा देण्यात आली.या सगळ्या राजकीय गणितामध्ये आणि बळी पडलेल्या मुलींना न्याय मिळण्याच्या प्रक्रियेचं काय होईल,याची सुद्धा चिंता आहे.
काँग्रेस/एनसीपीने घेतलेली भूमिका न्यायदानापर्यंत राहिली पाहिजे !
परंतु दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र भारतीय जनता पार्टी हे प्रकरण दाबण्याचा मोठा प्रयत्न करत आहे,असे सांगत काँग्रेसचे नाना पटोले यांनी महाराष्ट्रामध्ये पक्षीय बलाच्या जोरावर आंदोलने सुरू केली आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे महाराष्ट्रातील तमाम नागरिकांचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले आहे. वास्तविक पाहता या चिमुकल्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणी राज्यातील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस राजकारण करत आहे का ? तर भारतीय जनता पार्टी ही शाळा आपल्या कार्यकर्त्याची आहे म्हणून प्रकरण दडपू पाहात आहे का ? असा ही प्रश्न सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चिला जात आहे.खरं तर असे प्रश्न उपस्थित होण्यास अनेक कारणं सुद्धा आहेत.याच पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मागच्या दहा वर्षात अनेक बलात्कार आणि लैंगिक शोषणाची प्रकरने झाली.यामध्ये काँग्रेस आणि एनसीपी ने कधीच मोठी भूमिका घेतल्याचे चित्र कुठे दिसत नाही.त्यामुळे बदलापूर प्रकरणी काँग्रेस/एनसीपीने घेतलेली भूमिका न्यायदानापर्यंत राहिली पाहिजे,असे सुद्धा चौका चौकात चर्चिले जात आहे.
मुख्यमंत्री साहेबांचे राज्याला आश्वासन,आश्वासन लवकर पूर्ण होईल का !
परंतु वेळ जशी जात होती तस तसे लैंगिक शोषण प्रकरणावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपापली मतं व्यक्त केली. या लैंगिक शोषण प्रकरणी खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा म्हणतात की,हे प्रकरण फर्स्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपील कठोर शिक्षा केली जाईल.तर राज्याचे देवेंद्र फडणवीस म्हणतात की,या प्रकरणी एसआयटी गठीत करून या प्रकरणाचा पूर्ण तपास केला जाईल.
बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणी शिंदे-फडवणीस सरकार गंभीर आहे का !
बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणाने राज्यातील समाजमन हेलावून गेलं आहे.खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रातील लहान मुली देखील सुरक्षित नाही.महाराष्ट्रातील घटना ही महाराष्ट्रालाच काळीमा फासणारी आहे.किंबहुना 13 ऑगस्टला घडलेले हे प्रकरण दाबण्यासाठी सरकारनेच प्रयत्न केले असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनात येत आहे.प्रकरणातील शिक्षण संस्था भाजप आणि संघाशी निगडित असल्याने भाजप आणि संघाची बदनामी होऊ नये म्हणून अशा पद्धतीची काळजी त्या ठिकाणी घेत आहे.परिणामी,त्याचा उद्रेक समाजामधून झाल्याचे काल बघायला मिळाले.तर सत्ताधाऱ्यांची आणि सत्तेची गर्मी या ठिकाणी बघायला मिळाली.
संस्कार व संस्कृतीमध्ये जर महिलांना दुय्यम स्थान असेल तर महिलांना धोका होणारच !
भारतात महिला मुलींवर बलात्कार करणे ही जरी विकृती आणि लैंगिक हवस असली तरी,आपल्या देशात महिला/मुलीवर बलात्कार करणे ही बाब धार्मिक सुद्धा आहे.कारण जिथं धर्माच महिलांना शारीरिक अवयवा वरून दुय्यम सामाजिक दर्जा देतो आणि ज्या धर्माचे आदर्श देवता पुरुष जर स्त्री लंपट असतील तर मंदिरात व अन्यत्र महिला मुलींवर बलात्कार होणारचं….
हिंदुत्वाच्या मजबुतीसाठी राजकीय नेतेच बलात्काराचं समर्थन करतात !
तसे ही वास्तविकपणे पाहिल्यास लक्ष्यात येईल की,आपल्या देशातील अनेक राजकारणी स्त्रिया आणि पुरुष मंडळी या देशामध्ये हिंदुत्वाचा डंका वाजवतात आणि हिंदुत्वाची धर्मनिती राजकीय सत्तेमध्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात,त्यांनी राजरोसपणे महिला आणि मुलींवर होणाऱ्या बलात्काराचे समर्थनचं केले आहेत ना… याचे अनेक पुरावे आपल्याला आपल्या भारतीय राजकारणात विशेषता: भारतीय जनता पार्टीच्या नेतेमंडळीतील दिसून येतील.त्यातही देशातील मागासवर्गीय आदिवासी भटक्या महिला मुलींवर बलात्कार झाल्यास ही मंडळी जीभा सैल सोडून स्टेटमेंट देत असतात.
लैंगिक शोषणाची कारणे धर्मामध्ये आणि राजनीति मध्ये शोधले पाहिजे !
त्यामुळे आपल्या देशामध्ये महिला आणि मुलींवर होणाऱ्या बलात्काराच्या प्रकरणांमध्ये कायदेशीर सल्ला किंवा कायदेशीर न्याय तर जरुरीचा आहे.परंतु या अशा आघोरी समस्या पासून भारताला जर मुक्ती मिळवायची असेल तर त्यांनी त्याचं समाधान धर्मामध्ये आणि राजनीति मध्ये शोधले पाहिजे. कारण आपल्या देशामध्ये बहुतेक वेळा असेच होते की,बहुतांश बलात्कार हे अस्पृश्य मागासवर्गीय,
आदिवासी,भटक्या जमातील महिला मुलींवर केले जातात.परंतु त्यांना त्यांना कोठे न्याय मिळत नाही ? तर दुसऱ्या बाजूला जे बलात्कार होतात किंवा जे लैंगिक शोषण होते,त्या प्रकरणांमध्ये आपण ज्या धर्माचे पालन करतो,ज्या धर्माच्या संस्कृतीचे पालन करतो,त्याचे पडसाद आपल्या मन-मेंदूवर मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते.आणि मग अशा प्रवृत्तीची माणसं जसं काय आपल्याला धर्मांनं हक्कच दिला आहे की,एखाद्या महिला आणि मुलीवर आपण बलात्कार केला पाहिजे,तिचं “लैंगिक” शोषण केलं पाहिजे.अशावेळी सुद्धा महिलेला आपमान सहन करावा लागतो.
मुख्यमंत्री साहेबांची सारवा-साराव भारतीय जनता पार्टीला तारेल का !
तर दुसऱ्या बाजूला खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा म्हणतात की हे प्रकरण फर्स्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा केली जाईल.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की,या प्रकरणा एसआयटी गठीत करून या प्रकरणाचा पूर्ण तपास केला जाईल. परंतु दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र भारतीय जनता पार्टी हे प्रकरण दाबण्याचा मोठा प्रयत्न करत आहे असे सांगत काँग्रेसचे नाना पटोले यांनी महाराष्ट्रामध्ये पक्षीय बलाच्या जोरावर आंदोलने सुरू केली आहेत.या सगळ्या गोष्टींमुळे महाराष्ट्रातील तमाम नागरिकांचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले आहे.वास्तविक पाहता या चिमुकल्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणी राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस असा ही प्रश्न सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चिला जात आहे.
महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी मंदिरात बलात्कार करून महिलेला ठार मारले पण कुठेचं आंदोलन झालं नाही ?
यास पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अगदी काल परवाच पालघर येथे एका तीस वर्षीय महिलेवर देवाच्या साक्षीने मंदिरात बलात्कार करण्यात आला.यावेळी नुसता बलात्कारच करण्यात आला नाही,तर त्या महिलेला ठार मारण्यात आले.परंतु महाराष्ट्रामध्ये कुठे एखादं साधं आंदोलन सुद्धा करण्यात आलं नाही. अण्णा त्या नारीच्या निषेधार्थ राज्यातील कोणता मंदिराने बंद पाळला नाही ? या ठिकाणी भारतीय जनता पार्टी,शिवसेना,मनसे सारखे पक्ष तर आरोपी आहेत,परंतु धर्मनिरपेक्षवाले जाणते राजे शरदचंद्र पवार साहेब आणि नाना पटोले यांनी यावर ब्र शब्द देखील बोलले नाहीत.याचा अर्थ असा होतो की,पक्षीय राजकारण करण्यासाठी जर एखादा प्रबळ मुद्दा असेल परंतु परंतु तो किती ही संवेदनशील असू द्या तो या लोकांना “मताचं” राजकारण करण्यासाठी उपयुक्त ठरतो,असे ही या बदलापूर प्रकरणातून दिसून येत आहे.
विजय अशोक बनसोडे
लेखक / संपादक 8600210090
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत