यंदाही बारावी निकालात मुलींनी बाजी मारली.

आयु. तनिशा बोरमणीकर शंभर टक्के गुण मिळवत राज्यातून प्रथम
काल महाराष्ट्र बोर्डाचा उच्च माध्यमिक म्हणजेच बारावीचा निकाल जाहीर झाला. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती.
यंदाच्या परीक्षेमध्ये एकूण 95.4 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर, 91.60 टक्के मुलं उत्तीर्ण झाली. छत्रपती संभाजी नगर येथील विद्यार्थिनी आयु. तनिशा बोरमणीकर हिने एकही मार्क न गमावता शंभर टक्के गुण मिळवत राज्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
विभाग निहाय निकाल – कोकण 97.51 % लातूर 92.36 % नाशिक 94.71 % अमरावती 93.00 % कोल्हापूर 94.24 % मुंबई 91.95 % छत्रपती संभाजीनगर 94.08 % नागपूर 92.12 % पुणे 94.44 %.
बारावीत विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक 7,60,46 विद्यार्थी, कला शाखेसाठी 3, 81,226 आणि वाणिज्य शाखेसाठी 3, 29,905 विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत होते. व्यावसायिक अभ्यासक्रमातील 37,226 आणि आटीआयमधील 4750 विद्यार्थ्यांचाही निकाल यावेळी जाहीर झाला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत