राजकीय स्वातंत्र्याची गटाळगंगा!

प्रा.मुकुंद दखणे.
स्वातंत्र्य अबाधित असते.पेरीयार रामास्वामी नायकर, म्हणतात की, “देश खराखुरा स्वतंत्र व्हायचा असेल तर धर्म, सत्ता व सरकार यात क्रांतिकारक बदल व्हायला पाहिजे. “
आपल्या देश इंग्रजां पासून स्वातंत्र्य होऊन आज 77 वर्ष लोटली,पण खरोखरचं तळागाळातील लोकांपर्यंत स्वातंत्र्य पोहचले कां? हा खरा प्रश्न उपस्थित आहे.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्पष्ट मत आहे की, जोपर्यंत सामाजिक स्वातंत्र्य कोणत्याही देशात जमिनीवर उतरत नाही, तो पर्यंत तो देश खर्याखुर्या अर्थाने स्वातंत्र्य च होत नाही. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्रजाविरूद्ध निव्वळ राजकीय स्वातंत्र्य लढ्यात न उतरता, सामाजिक स्वातंत्र्या करिता ,आयुष्य वेचले, हे जगतवंदणिय आहे. बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांचेत वाद निर्माण होता की, प्रथम राजकीय स्वातंत्र्य की प्रथम सामाजिक स्वातंत्र्य? गोपाळ गणेश आगरकर यांचा प्रथम सामाजिक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते तर बाळ गंगाधर टिळक हे प्रथम राजकीय स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते.सामाजीक स्वातंत्र्य राजकीय स्वातंत्र्य मिळाले की, ते आपोआप च
सामाजिक स्वातंत्र्यात बदलेल अशी बाळ गंगाधर टिळकां बरोबर च मोहनचंद करमचंद गांधी यांना सुद्धा वाटत होते. शेकडो भारतीयाने आपल्या राजकीय स्वातंत्र्या करिता बलिदान दिलेले आहे, त्यांच्या बलिदानाचा आज स्मरण दिवस आहे.पण, आपण 78वा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत असतांना, खरोखरच चिंतनाचा विषय आहे की, भारत देश, सामाजिक स्वातंत्र्याकडे वाटचाल करीत आहे कां? याचे उत्तर, नाही असे निश्चित नाही पण त्याचा वेग इतका स्लो आहे की आज
स्वातंत्र्याचा एकीकडे आपण 75वा वर्दापण, सुवर्ण वर्ष साजरे करीत असतांना, दुसरीकडे सामाजिक प्रश्न आवासून आहेत. 75 वर्षात आपण सामाजिक स्वातंत्र्य देशात निर्माण करू शकलो नाही, कां सामाजिक स्वातंत्र्य निर्माण करू शकलो नाही? याची समीक्षा होणे स्वाभाविक आहे. जो पर्यंत सामान्य रयताचे राज्य निर्माण होत नाही,तो पर्यंत भारत देश स्वातंत्र्य देश आहे असे यदाकदापिही म्हणता येत नाही.
आपला देश परकिंयांपासून राजकीय दृष्टिकोनातून निश्चित स्वतंत्र आहे, पण भारतीयांपासूनच आपण निश्चित आजुन ही स्वातंत्र्य न झाल्या कारणांस्तव, आपण सामाजिक स्वतंत्र्य नाही. धार्मिक वलयी सामाजिक गुलामगिरीत किचपट पडलेले आहोत. याचे मुख्य कारण आपणास राजकीय नेत्यांच्या मानसिकतेत आढळते.आणि जो पर्यंत या देशातील राजकीय नेत्यांची राजकीय सत्तेची हाव, ही सामाजिक सत्तेत परावर्तित होत नाही, तो पर्यंत हा देश कधीच सामाजिक दृष्ट्या स्वतंत्र होवूच शकत नाही.कारण राजकीय स्वातंत्र्याची तृष्णाही इतकी भयानक असते की, ती सामाजिक स्वातंत्र्याला गिळंकृत करीत राहत असते.मानवी जीवनातील आनंद, सुख जर कोण हिरावून घेत असेल तर ती असते मानवी तृष्णा. या देशातील हजारो वर्ष जर सुख, आनंद, मानवता कोणी हिरावून घेतली असेल तर ती ब्राह्मणवादी मानसिकतेत दडलेल्या तृष्णेणे. ही तृष्णा इतकी तळागाळातील मळा इतकी, भयानक आहे की, तिने मानवाला, मानवतेपासून, मानवतेच्या स्वातंत्र्या पासून, दूर ठेवलेले आहे.आणि म्हणूनच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकीय स्वातंत्र्यापेक्षा, सामाजिक स्वातंत्र्याला प्राध्यान्य दिलेले दिसते. 1920च्या सुमारास डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक स्वातंत्र्याचे राजकारण, महात्मा जोतीबा फुले यांना गुरु मानुन सुरुवात केलेले आहे. मोहनचंद करमचंद गांधी ने सुद्धा याच दरम्यान, आपल्या राजकीय स्वातंत्र्याच्या कॅरियरला सुरुवात केली पण दोंघाच्या विचारात, आकाश आणि जमिनी एवढे अंतर होते. जे आजही राजकीय आणि सामाजिक विचारवंतात आहे.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या सत्याग्रहाने सामाजिक स्वातंत्र्याला प्रथम वाचा फोडून, सामाजिक स्वातंत्र्याचा हुंकार जनमानसात, विशेषतः हिंदु बहिष्कृत समाजात पेटविला, जो आजही धगधगत, चेतत आहे आणि तो तेव्हाच विझु शकतो जेव्हा, भारतात सामाजिक स्वातंत्र्य अवतरेल. आपल्या देशात असंख्य देव, देवता, बाबा, बुवा अवतरले पण आजुन ही सामाजिक स्वातंत्र्य भारतात अवतरले नाही. हे भारतीयांचे अक्षम्य दुर्दैव होय.हे दुर्दैव
सुदैवात बदलावे म्हणूनच, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी, महाडच्या सत्याग्रह सुरू केला. त्याचे कारण प्रतीकाराशिवाय सामाजिक अन्यायाचे प्रश्न सुटणे दुरापास्त आहे, याची त्यांना जाणीव होती. किंवा जाणिव झाल्यानेच, त्यांनी पिण्याच्या पाण्या साठी, क्रांतिची सुरुवात केली.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, “अखेरे महाड च्या पाणी सत्याग्रह निमित्ताने सामाजिक स्वातंत्र्याच्या झगड्याला प्रत्यक्षपणे तोंड लागणार याबद्दल आम्हांला आनंद होतो.परकिय लोकांपासून स्वराज्याचे हक्क मागणार्या” श्रेष्ठ वर्णीय हिंदुुंनीं आपल्या सहा सात कोटी भाईबंदाना सामाजिक आणि धार्मिक बाबतींत बरोबरीच्या नात्याने, वागवू नये.,उलट पशुंपेक्षाही नीच तर्हेची वागणूक त्यांना द्यावी हा दैवदुर्विलासाचा कडेलोट होय.” पुढे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “साध्या माणुसकीच्या वागणूकीकरिता आपल्याच लोकांविरूद्ध सत्याग्रहाच्या रूपाने विरोधी झगडा करण्याचा प्रसंग यावा. यापेक्षा अधिक शोचनीय गोष्ट कोणती?पण परिस्थिती पुढे इलाज नाही.सोन्याची सुरी झाली म्हणून कोणी काही तिला आपल्या पोटात खुपचुन घेणार नाही.आपलेच लोक (हिंदुुच)झाले ते माणूसकीवर घाला घालूलागले तर त्यांना विरोध करणे प्राप्त च आहे. ” डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा हा लढा निव्वळ विरोधासाठी नव्हता, तर हिंदु समाजात माणुसकीच्या,सामाजिक स्वातंत्र्याच्या जागरणासाठी होता.आणि आजही,स्वातंत्र्याचे 78 व्या वर्षी सुद्धा, हिंदुुमानसिकतेत
जनजागरण करणे अत्यावश्यक आहे, ती राष्ट्र गरज असावी, या सारखी शोकांतीका ती कोणती?
स्वातंत्र्य ही काही खाण्यापिण्याची निश्चित गोष्ट नव्हे.
ती जगण्यात निर्भयता आणणारी गोष्ट आहे. तुम्हा वर्तनात निर्भयता नसेल, कोणत्याही प्रकार ची भीती असेल तर तुम्हास व तुम्हा समान दुसर्यास सुद्धा भीतीयुक्त जगणे क्रमप्राप्त असेल ,तर तुम्हास कदाचितही प्रगती साधता येणार नाही. विकास साधता येणार आहे. आणि विकास हाच मानवी ध्यास होय. म्हणूनच विकासाचीच पायरी ही
स्वातंत्र्य होय. आपणास भारतीय संविधानाने राजकीय स्वातंत्र्य दिले असले तरी आणि सामाजिक स्वातंत्र्य ही दिले असले तरी, आजुन ही सामाजिक स्वातंत्र्याची मानसिकता, उच्च शिक्षितांमध्ये जेथे निर्माण झाली नाही, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशात अवतरली नाही, तेथे सर्व सामान्य अज्ञानी लोकांचे काय? एकवेळा अडाणी अज्ञानी परवडला पण उच्च शिक्षित हे अधिक सभ्रमित असलेले दिसते आणि यामुळेच भारताचा विकास अपेक्षित असा झाला नाही.याचे मुख्य कारण म्हणजे,शिक्षणातील दुर्दशा होय. विचित्रता होय. ही शिक्षणातील दुर्दशा आणि विचित्रता जोपर्यंत आपण समुळ नष्ट करण्यात यशस्वी होत नाही आणि सुसंस्कारित,नैतिक शिक्षणानाची पेरणी करीत नाही,तो पर्यंत सामाजिक स्वातंत्र्य जमीनीवर प्रत्यक्षात अवतरणे अशक्य आहे आणि सामाजिक स्वातंत्र्या शिवाय अपेक्षित अशी भारत देश प्रगती साधेल,? असे वाटत नाही. कोणी कितीही राजकीय नेत्यांनी, प्रधानमंत्री
पदस्तानी ओरडून सांगितले, तरी सामाजिक स्वातंत्र्याशिवाय खरी प्रगती देश साधणे असंभव आहे. आणि याच एकमेव कारणास्तव, देशाची लोकसंख्या भरमसाठ आहे. पण,देशातील प्रमुख मंत्रीमंडळ, जर वाढत्या लोकसंख्येबाबत,गंभीर नसेल तर आणि मंत्रीमंडळाला देशातील प्रत्यक्षात लोकसंख्या आणि
त्यांचा सामाजिक _आर्थिक स्तर च माहित नसेल, तर योजना कशा आखता येईल? आणि निती आयोग स्थापुन त्या आयोगामध्ये नीतीभ्रष्ठ लोक असेल तर, देशातील महागाई, भ्रष्टाचार, रोगराई, बेकारी,धार्मिक मार्तंडता, अज्ञान, अविज्ञान,शेतीची अपिकी, नाशधुश, अंधश्रद्धा, जातीयवाद, अस्पृश्यता, धर्मभेद, लिंचिंग प्रकार, दरोडे, मार्यामार्या, झुंडबाजी, मोर्चे, उपोषण, बहिष्कार, अन्याय, अत्याचार वाढणार नाही तर काय होईल? आणि अशा समस्या जर वाढतच राहणार तर देश प्रगती कशी, साधणार? तर विश्व गुरूच्या वल्गना ठरणार नाही तर काय?
भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वीच स्पष्ट सांगून ठेवले आहे की, जो पर्यंत मनुवाद, वैदिक भडवेपणा, ब्राह्मणवाद, विषमता पोषक धर्म, दैववाद, अंधश्रद्धा, अविज्ञान, शिक्षणातील बावळटपणा,अबंधुतेची भावना, समुळ नष्ट होणार नाही, तो पर्यंत मानवी जीवन प्रगत, आनंदी, सुखी समृध्द होणे असंभ आहे.
भारताते प्रधान मंत्री मोदी परदेशात जातात, तेव्हा जगाला सांगत फिरतात की सामाजिक समतेच्या,सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता बुद्धाची भूमी, भारत देश आहे आणि भारतात आल्यावर ,सामाजिक स्वातंत्र्याच्या, सामाजिक समतेच्या विरूद्ध विचार सरणी असलेल्या राम, कृष्णाचे पाय धरून धरून धुत राहतात.तर देशात सामाजिक समतेचे, सामाजिक स्वातंत्र्याचे वातावरण कसे निर्माण होणार? आणि भगवान बुद्धाच्या मते,मानवी जीवनावर सर्वाधिक परिणाम हा वंशसंस्कारापेक्षा सामाजिक वातावरणावरणाचा होत असतो आणि सामाजिक वातावरण निर्माण करण्याची क्षमताच जर भारताचे पंतप्रधान, राजकीय नेते, राज्यकर्ते यांचे मध्ये उत्पन्न नसेल तर देश सामाजिक स्वतंत्र्य कसा बनेल?
सामाजिक स्वातंत्र्याशिवाय देश, विविध समस्येतून मुक्त कसा होईल? आणि समस्या मुक्त भारताशिवाय देश विश्व गुरु कसा बनेल?
म्हणूनच बोलघेवड्या राजकीयांसाठीच तुकाराम महाराज म्हणतात, “बोले तैसे चाले त्याची वंदावे पाऊले. ” ज्या देशात शाळेपेक्षा मंदीर, मज्जीदाच्या देखभालीवर खर्च अधिक होतो असा देश “गटाळगंगेपेक्षा “वेगळा अशक्य आहे.म्हणूनच, राजकीय स्वातंत्र्याची वाटचाल अधिक वेगाने सामाजिक स्वातंत्र्यात परावर्तित होणे काळाची गरज होय. राजकीय स्वातंत्र्याची गटाळगंगा निर्मळ, पवित्र बनविणे अत्यावश्यक आहे.
आणि
हे सर्व सुज्ञं मतदारावर अवलंबून आहे.
🌷
प्रा.मुकुंद दखणे.
यवतमाळ 9373011954.
जयभीम 👏🏾जयभारत!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत