बौद्ध धम्माचा स्वीकार व आचरण केल्यास माणूस सुखी होतो :–प्रबुध्द साठे
उरळीकांचन (पुणे) :– देशसेवा, समाजसेवा, कुंटुबाचे पालनपोषण करणे हे कर्तव्य असून सत्यधम्माला व सदाचाराला आत्मसात करणे हे मानवी जीवनाचे ध्येय आहे असे प्रतिपादन चला आपल्या बुध्दाच्या घरी अभियानाचे प्रमुख व भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध साठे यांनी केले , ते भारतीय बौद्ध महासभा उरळीकांचन शहर शाखा आयोजित महाबोधी बुध्द विहार बडेकर नगर उरळीकांचन येथे वर्षावास निमित्त धम्म प्रवचन देताना बोलत होते, यावेळी बाळासाहेब बडेकर,दिपकनाना बडेकर, रविंद्रनाथ बडेकर, राजाराम मस्के आदी मान्यवर उपस्थित होते,
प्रबुद्ध साठे आपल्या धम्म प्रवचनात पुढे म्हणाले, बौद्ध धम्म आचरणाचा धम्म असून परिवर्तनाची सुरूवात स्वतः पासून करा, देव धर्म जात अज्ञान अंधश्रद्धा या गुलामी व अंधारातून बाहेर पडून माणूस बना, खरे बौद्ध व्हा, उपवास म्हणजे उपाशी राहणे नव्हे तर स्वतः जवळ राहणे म्हणजेच वाईट अकुशल कर्मापासून दूर राहणे, यासाठी वर्षावास काळात उपोसथ पाळणे म्हणजे पंचशील आष्टशील,पारमिता अनुपालन करणे होय, शिक्षणाला सामाजिक जाणिव व संस्काराची जोड दिली तर सद्गुणी माणूस बनतो, घरातील देव्हारा बाहेर काढायचा असेल व बौद्ध धम्म चळवळ गतीमान करायची असेल तर महिलांचा सहभाग चळवळीत वाढला पाहिजे असेही प्रबुद्ध साठे यांनी म्हटले, यावेळी विद्यार्थी मुले मुली व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत