सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पुण्यात जल्लोषात स्वागत
ऍड. अश्विनी कांबळे
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम २००९ या कायद्यामध्ये महाराष्ट्र सरकारने ९ फेब्रुवारी २०२४ रोजी बदल करून आर्थिक व सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना नामांकित विनाअनुदानित खाजगी शाळांमध्ये प्रवेशाचे मार्ग बंद केले होते.
महाराष्ट्र सरकारच्या या असंविधानिक निर्णयाच्या विरोधात ऍड. अश्विनी कांबळे व इतर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेची दखल घेत माननीय उच्च न्यायालयाने राज्य सरकारने आरटीई कायद्यामध्ये केलेला असंविधानिक बदल रद्दबादल ठरवून महाराष्ट्र सरकारला मोठी चपराक दिली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात काही खाजगी शाळांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये एस एल पी दाखल करून मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने खाजगी शाळांची मागणी असंविधानिक ठरवत आरटीई कायद्यान्वये नामांकित खाजगी विनाअनुदानित शाळांनी २५ टक्के जागांवर आर्थिक व सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक आहे असा ऐतिहासिक निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने भारतातील आर्थिक व सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकातील तसेच दलित मागासवर्गीय घटकातील करोडो विद्यार्थ्यांना नामांकित विनाअनुदानित खाजगी शाळांमध्ये प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला.
सर्वोच्च न्यायालयामध्ये लढून विजयश्री खेचून आणण्यासाठी माझ्या बरोबरचे सह जनहित याचिका करते स्वप्नील बोर्डे पुणे, वैभव कांबळे, अनिकेत कुतरमारे नागपूर, समाजवादी नेते डॉ. प्राध्यापक शरद जावडेकर सर, आयु. खरे मॅडम तसेच न्यायालयामध्ये ज्यांनी आमची बाजू अभ्यासपूर्ण मांडली त्या ज्येष्ठ विधीज्ञ ऍड.जायना कोठारी मॅडम, बेंगलोर, ऍड. पायल गायकवाड नागपूर, ऍड. राज कांबळे, ऍड. वसुधा चांदवानी मुंबई, ऍड. अपर्णा मेहरोता, दिल्ली, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तसेच हा न्यायालयीन लढा लढण्यासाठी ज्यांनी मला वेळोवेळी प्रोत्साहित करून आर्थिक मदत केली व आपला बहुमूल्य वेळ दिला ते माझे सहकारी ऍड. जितेंद्र कांबळे या सर्वांचे मनापासून शतशः आभार. 🙏🙏
आपली
ऍड. अश्विनी कांबळे
जनहित याचिकाकर्त्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत