भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जम्मू काश्मीरबाबत दिल्लीत उच्च स्तरावर बैठक
जम्मू-काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादाविषयी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज दिल्लीत एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. भारतीय सैन्याकडून ही माहिती देण्यात आलीय. चार दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची शक्यता आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. भारतीय सैन्यानी अस्सर असे नाव या मोहिमेला दिले दहशतवाड्यामध्ये आणि जवानांनमध्ये ओप्रेशन भारतीय सैन्याचा 48 राष्ट्रीय रायफलचे कॅप्टन भारत मातेला शाहिद झाले अत्यंत दुःखदायी घटना स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व सांधेला आलेली आहे.
अगदी मनाला हतबल करणारी ही घटना आहे यांचकरिता दिल्लीत उच्च स्तरावरील बैठक घेण्यात आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार, एन्काऊंटरमध्ये एक नागरिक जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. जवानांना दहशतवाद्यांकडे असलेली एम-4 रायफल आणि 3 बॅग मिळाल्या आहेत. पटनीटॉपला लागून असलेल्या जंगलात ही चकमक सुरु झालेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षापथकं आणि दहशतवाद्यांमध्ये थांबून-थांबून गोळीबार होत आहे. रात्रीच्यावेळी सुद्धा जवान तिथे होते. सकाळी उजेड होताच पुन्हा शोध मोहिम सुरु झाली. आज सकाळी 7.30 वाजता पुन्हा गोळीबाराचा आवाज झाला.जम्मू काश्मीर मध्ये सुरक्षा सुरक्षापथकांना उच्च अलर्ट वर ठेवण्यात आलेलं आहे.जनरल प्रतीक शर्मा आणि अन्या सुरक्षा यंत्रनेचे मुख्य अधिकारी उपस्थित आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत