अण्णाभाऊंचा आंबेडकरवाद हा आमच्या सन्मानाचा विषय- प्रबुद्ध साठे
देहूरोड धम्मभूमी;–
जग बदलण्या उठ मातंगा, निळा झेंडा घेऊन हाती घाव घाल भीमाचा होशील वारसा खरा तू अण्णाभाऊंचा अशी काव्यात्मक सुरूवात करीत साहित्यरत्न आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितला म्हणून मातंग समाजाने आंबेडकरवाद स्वीकारायाचा अशातला मुळीच भाग नसून आंबेडकरवाद हा आमच्या सन्मानाचा विषय आहे म्हणून मातंग समाजानेच नव्हे तर बहुजनांनी स्वीकारायाचा आहे आंबेडकरवाद हाच अण्णाभाऊं साठे यांचा विचार, प्रेरणा व भूमिका आहे असे प्रतिपादन चला आपल्या बुध्दाच्या घरी अभियानाचे प्रमुख व भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध साठे यांनी केले, ते पुणे येथील देहूरोड धम्मभूमी या क्रांतिकारी ठिकाणी साहित्यरत्न आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बुध्द विहार कृती समिती धम्मभूमी देहूरोड चे संस्थापक अध्यक्ष व विकास प्रणेते आदरणीय टेक्सास दादा गायकवाड, होते, याप्रसंगी बारामती चे गोरख साठे, गोपाळराव तंतरपाळे, लहुजी क्रांती मोर्चा चे शेषनारायण पवार, लक्ष्मण साळवे, बहुजन संघटकचे राहुल खांडेकर, जिजाभाऊ लोणके आदी मान्यवर उपस्थित होते, प्रबुद्ध साठे आपल्या भाषणात पुढे म्हणाले, मध्यंतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बोलताना म्हटले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी शेवटपर्यंत हिंदू धर्म सोडला नाही, धर्मांतर केले नाही,, यावर साठे यांनी इशारा देत म्हटले पण अण्णाभाऊंनी तुमची धर्म व्यवस्था नाकारली,, धनवतांनी अखंड पिळले , धर्मांधांनी तसेच छळले,
अण्णाभाऊ साठे हिंदुत्ववादी कधीच नव्हते, आयुष्य लाभले असते तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी बौद्ध धम्माचाच स्वीकार केला असता, त्यामुळे त्यांच्या नावावर चूकीचा संदेश देत असाल तर RSS चे सरसंघचालक मोहन भागवत नागपूरच्या तुमच्या मुख्य कार्यालयात येवून तुमच्या तोंडाला काळे फासू, कारण अण्णाभाऊंचा फकीरा, वारणेचा वाघ महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भीमसैनिक बनत आहे,, अण्णाभाऊंचा कम्युनिस्ट चळवळीत वावर जरुर होता, पण त्यांनी जग बदलण्या साठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा घाव घालायला सांगितले, कम्युनिस्टवाद हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चरित्राचा भाग आहे तर आंबेडकरवाद हे चारित्र्य आहे असे ही प्रबुद्ध साठे यांनी म्हटले, सुत्रसंचालन अशोक गायकवाड यांनी केले , बुद्ध विहार कृती समिती देहूरोड धम्मभूमी च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी केला, यावेळी मोठ्या प्रमाणात स्री पुरुष बहुजन समाज उपस्थित होता
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत