सोलापूर शहरातील,बेवारस मनोरुग्णांना वयोवृध्द लोकांना मोफत जेवण देण्यासाठी संभव फाऊंडेशनच्या अन्नपूर्णा योजनचे लोकार्पण करण्यात आले.
संभव फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षांपासून बेवारस मनोरुग्णांसाठी कार्यरत असून जागेअभावी मनोरुग्णांची सेवा स्मशान भूमीत करत त्यांना आंघोळ घालणे असो की त्यांची
मलमपट्टी,दाढी,कटिंग,मलमुत्र स्वच्छता निस्वार्थ भावनेने गेली आठ वर्षांपासून करत आहे.सोलापूर जिल्ह्यातून बेवारस व घरातून बाहेर पडून भटकणाऱ्या २८८ हुन अधिक मनोरुग्णांनाचे कौटुंबिक पुनर्वसन केलं आहे.
कर्नाटक,बिहार,राजस्थान,छत्तीसगड,तामिळनाडू, गुजरात,दिल्ली आदि राज्यातील दुरावलेल्या मनोरुग्णांच्या कुटुंबांची भेट घडवून आणली असून ८०० हून अधिक मनोरुग्णांची सेवा त्यांच्यावर उपचार,कपडे,दाढी केस तसेच त्यांच्या औषधपाण्याची व्यवस्था संभव फाउंडेशनच्या माध्यमातून केली जात आहे
या रस्त्यावर व चौकात बेवारसपणे फिरणाऱ्या मनोरुग्णांना
पोटभर जेवण मिळावे या हेतूने संभव अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली आहे समाजातील उपेक्षित दुर्लक्षीत असणाऱ्या मनोरुग्णांना पुन्हा समाजाच्याप्रवाहात आणण्याचं कार्य व त्यांचं पुनर्वसन करण्यासठी संभव फाउंडेशनचे प्रयत्न आहेत.
इथॉस रियालिटी समूहाचे प्रमुख
युवा उद्योजक तुकाराम गायकवाड सर यांच्या हस्ते तर
मा. गटनेते/मा. नगरसेवक सो.म.पा.आनंद (दादा) चंदनशिवे,
यांच्या प्रमुख उपस्थितीत संभव अन्नपूर्णा योजनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी
अंजलीताई वाघमारे,मा.सुरेश पवार,शशिकांत टाकळीकर, राजू पुजारी,कदिर जमादार, संभव फाउंडेशनचे अध्यक्ष आतिश कविता लक्ष्मण,अजय हिरेमठ,रोहन कामाने, मंगेश लामकाने
आदींची उपस्थिती होती.
प्रतिक्रिया
रस्त्यावर बेवारस अवस्थेत खितपत पडलेल्या मनोरुग्णांसाठी हक्काचा निवारा मिळवून त्यांना नवं जीवन जगता यावं यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.कुणीही भुकबळीचा शिकार होऊ नये समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन हि संभव अन्नपूर्णा योजना गरजू पर्यंत पोहोचवावी अन्नपूर्णा योजनाचा गरजूंना लाभ देण्यासाठी संपर्क साधा ९७६५०६५०९८
आतिश कविता लक्ष्मण
संभव फाउंडेशन, सोलापूर
9765065098
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत