नागपंचमीचा संबंध “नाग” या सरपटणा-या सापासी नसून भारतात नाग हे “टोटेम” असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेलेत.
अशोक तुळशीराम भवरे
१• नागराजा अनंत (शेष)
२• नागराजा वासुकी
३• नागराजा तक्षक
४• नागराजा कर्कोटक
५• नागराजा ऐरावत
ह्या पाच ही नाग वंशीय राजांचे स्वतंत्र राज्ये होती.
यामध्ये नागराजा अनंत हा सर्वात मोठा. जम्मू-काश्मीर मधील अनंतनाग हे शहर त्यांच्या स्मृतीची साक्ष पटवून देते.
त्यानंतर दुसरा नागराजा वासुकी नागराजा हा कैलास मानसरो पासून उत्तर प्रदेश क्षेत्राचा प्रमुख होता.
तिसरा नागराजा तक्षक यानेच जगप्रसिद्ध तक्षशिला विश्वविद्यापीठ स्थापन केले. येथेच पुढे प्लेटो, अँरीस्टॉटल सारखे तत्वज्ञ शिकून गेलेत.
चवथा नागराजा कर्कोटकाचे रावी नदीच्या शेजारील प्रदेशात राज्य होते.
पाचवा नागराजा ऐरावत (पिंगाला) भंडारा प्रांत आजही पिन्गालाई एरीया म्हणून ओळखला जातो.
ह्या पाच ही नागराजांच्या गणराज्याच्या सीमा ऐकमेकांच्या राज्याला लागून होत्या.
पाच नागराजे मृत्यू पावल्या नंतर, त्यांच्या जन्म स्मृतिप्रित्यर्थ नागवंशीय लोकांनी “नागपंचमी” दिन दरवर्षी साजरा करीत असत.
आर्य व अनार्य यांच्या मध्ये लढाया व तुंबळ युद्ध झाली. आर्य लोकांनी नागाना जाळून टाकल्याचे दाखले पुराणात सापडतात. अगस्ती मुनिने त्यातून फक्त एक नाग मनुष्य वाचविला. त्याचेच आपन वंशज आहोत. ज्या नाग लोकांनी एवढा छळ सोसावा लागला. त्यांना वर येण्यास कोणीतरी महापुरुष हवा होता, त्यांना तो महापुरुष गौतमबुद्ध भेटले. भगवान बुद्धाचा उपदेश नाग लोकांनी सर्व भारतामध्ये पसरविला. नाग लोकांनी मुख्य वस्ती नागपूर येथे येथे व आसपास होती असे दिसते. म्हणून या शहरास ‘नागपूर ‘ म्हणजे नागाचे गाव असे म्हणतात. येथून सुमारे सत्ताविस मैलावर नागार्जुनाची टेकडी आहे. नजीकच वाहणारी नदी आहे ती नागनदी आहे. अर्थातच या नदीचे नाव येथे राहणाऱ्या लोकांवरुण पडले आहे. यावरुन नागवंश हा या देशातला राज्यकर्ता वंश होता. त्याचप्रमाणे या नागवंशीय लोकांनी तथागत गौतम बुद्धाचा महान धम्म या पृथ्वीतलावर पसरवण्याचा प्रयत्न केला. याबाबतीत त्याचे अनेक उल्लेख सापडतात.
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
वरील इतिहास पाहता बौद्ध अनुयायीयांनी सरपटणारे नागाचा काहीही संबंध नाही हे लक्षात घेऊन वरील नाग लोकांच्या स्मरणार्थ आजचा दिवस साजरा करावा.
धम्म संदेश प्रसारक
अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत