आंध्र प्रदेशात विजयनगरमजवळ झालेल्या रेल्वे अपघातात अकरा जणांचा मृत्यू,तर पन्नासपेक्षा जास्त प्रवासी जखमी

आंध्र प्रदेशमध्ये विजयनगरम जिल्ह्यात कंटकपल्ली इथं काल संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला,तर पन्नासपेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले.विशाखापट्टणम-पालसा ही पॅसेंजर रेल्वे विशाखापट्टणम-रायगड या पॅसेंजर रेल्वेला मागून धडकली आणि त्यामुळे तीन डबे घसरले.जखमींना विशाखापट्टणम आणि विजयनगरममधील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मृतांप्रती संवेदना व्यक्त केली आहे.प्रधानमंत्री रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्या संपर्कात आहेत.प्रधानमंत्री राष्ट्रीय मदतनिधीमधून मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये,तर जखमींना ५० हजार रुपये भरपाई देण्यात येईल,असं प्रधानमंत्री कार्यालयानं जाहीर केलं. रेल्वे आणि आंध्र प्रदेश सरकारनं मृतांच्या कुटुंबीयाना प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.राष्ट्रीय आपत्ती निवारण दल,अपघात मदत रेल्वे आणि रुग्णवाहिकांतर्फे मदतकार्य वेगानं सुरू आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत