दु:खद बातमी! प्रसिद्ध तमिळ अभिनेत्याच्या मुलीने केली आत्महत्या.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी सुप्रसिद्ध तमिळ संगीतकार, अभिनेता आणि निर्माता विजय अँटोनीच्याअभिनेत्याच्या १६ वर्षीय मुलीने आज पहाटे (१९ सप्टेंबर) रोजी आत्महत्या केली आहे. आत्महत्या केल्याचे वृत्त समोर येताच सिनेसृष्टीमध्ये खळबळ उडाली आहे.
अभिनेत्याच्या मुलीने आपल्या चेन्नईतील राहत्या घरी गळफास घेतला आहे. पहाटे ३ वाजता विजय यांची मुलगी घरामध्ये मृतावस्थेत आढळली. लगेचच तिला कुटुंबीयांकडून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचाराआधीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. विजयची मुलगी चेन्नईतल्या एका प्रसिद्ध शाळेत शिक्षण घेत होती. रिपोर्ट्सनुसार, ती तणावाखाली होती आणि त्यासाठी तिच्यावर उपचार सुरू होते.
तात्काळ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, उपचारा आधीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. विजयच्या कुटुंबाबद्दल सांगायचे तर, पत्नी फातिमा आणि दोन मुली असा त्यांचा परिवार आहे. विजय अँटोनी टॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता असून त्याचं स्वत: चं प्रॉडक्शन हाऊस देखील आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत