‘स्ट्रीट लाईट’च्या प्रकाशाने शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पीक धोक्यात.

अकोला ते नांदेड या चौपदरीकरण महामार्गावर जवळपास दोनशे फूट परिसरात दिव्याच्या प्रकाशामुळे पिकांना हानी होत आहे.
जिल्ह्यातून जाणाऱ्या-अकोला नांदेड महामार्गावर मोठंमोठे स्ट्रीट लाईट लावण्यात आले आहेत. हा महामार्ग शेताजवळून गेलेला असल्याने पिकांवर दिवसा सूर्यप्रकाश तर रात्री दिव्यांचा प्रकाश पडत आहे. यामुळे किडे प्रकाशाकडे आकर्षित होत असून पीक परागीकरण प्रक्रिया थांबली आहे. परिणामी पिकांना फुल धारणा व शेंगाच उगवत नसल्याने जिल्ह्यातील जवळपास शंभर एकर पेक्षा अधिक क्षेत्रावरील सोयाबीन पिके धोक्यात आली आहे.
वाशिम जिल्ह्यातील अकोला ते नांदेड या चौपदरीकरण महामार्गावर लावण्यात आलेल्या दिव्यांच्या प्रकाशाचा फटका पिकांना होत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे. या महामार्गावर जवळपास दोनशे फूट परिसरात दिव्याच्या प्रकाशामुळे पिकांना हानी होत असल्याचे दिसून येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत