महाराष्ट्रमुख्यपानराजकीय
पृथ्वीराज चव्हाणांची मोदींवर टीका महाराष्ट्रातील घोडेबाजारावरून केला हल्लाबोल

पंतप्रधान मोदींनी मान्यता दिली नसती, तर महाराष्ट्रात घोडेबाजार झाला नसता, असं विधान पृथ्वीराज चव्हाणांनी केलं होतं. याला मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
महाराष्ट्रातील घोडेबाजावरून काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं, “आयाराम-गयाराम संस्कृती थांबवण्यासाठी राजीव गांधींनी पक्षांतरबंदी कायदा आणला. पण, अटल बिहारी वाजपेयींचं सरकार असताना २००३ साली कायद्यात सुधारणा आणि बदल झाले. त्यामुळे तो कायदा कुचकामी ठरला. या कायद्याने कुठलीही पक्षांतरबंदी थांबत नाही. घोडेबाजाराला उत आला असून, याचा प्रशासन, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.”
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत