
राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. काही दिवसांपूर्वी दिल्लीसह आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. यानंतर आज (मंगळवार, ३ ऑक्टोबर) नेपाळमध्ये ६.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपामुळे दिल्ली-एनसीआर प्रदेशासह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये जोरदार हादरे जाणवले.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या म्हणण्यानुसार, दुपारी दोन वाजून २० मिनिटांनी ४.२ रिश्टर स्केलचा पहिला भूकंप झाला. त्यानंतर ६.२ रिश्टर स्केलचा सलग दुसरा भूकंप झाला. या भूकंपामुळे दिल्लीसह आसपासच्या परिसरात अनेक वेळ धक्के जाणवले. यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत