दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणविचारपीठ
लोक शाहिर, लोकनायक अन्ना भाऊ साठे!
एम एल गोपनारायण.
एक ऑगस्ट लोकशाहीर, समाजसुधारक दलीत साहित्याचे दिपस्तंभ अन्ना भाऊ साठे यांचा जयंती दिन या दिनाच्या औचित्यावर त्यांच्या अथांग कर्तुत्व सागरातील दोन थेंब आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयास करीत आहे.
अन्नाभाऊ साठे यांचे मुळ नांव तुकाराम भाऊराव साठे.सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव ही त्यांची जन्मभूमी.घरची गरीबी आणि हलाखीची परिस्थिती.प्रस्थापितांचा वर्चस्ववाद,भेदभाव जाचाला कंटाळून अवघ्या दीड दिवसात त्यांनी शाळा सोडून दिली.अत्यंत काबाडकष्टाचे जीवन जगत असताना त्यांना खुप नैराश्य आले पण ते नैराश्याने खचले नाहीत.नैराश्य म्हणजे मनावर साचलेली धुळ आहे ती झटकली म्हणजे परत ताजे तवाने होता येते.अन्नाभाऊ साठेंनी हलाखीच्या परिस्थितीला आपल्यावर हावी होऊ दिले नाही.प्रतीकुल परिस्थितीसी दोन हात करीत त्यांनी आपले जीवन घडवले अशिक्षीत असुन आपल्या उपजत प्रतिभेच्या जोरावर कथा कादंबरी पोवाडे लावणी,आदी साहित्याची भरपुर रचना केली.त्यांचं साहित्य म्हणजे समाजाचा आरसा.त्यांच्या अनेक कादंबऱ्यावर ख्यातनाम दिग्दर्शकांनी चित्रपट बनवीलेत.त्यांच्या फकिरा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाने पारितोषिक देऊन गौरव केला.त्यांच्या साहित्यात तळागाळातील जीवनाचा तळफळाट होता.त्यांच लिखाण म्हणजे जीवंत वास्तव,जे जगतो अनुभवतो तेच लिहायचं त्यांच्या लिखाणात धगधगते निखारे होते.परिवर्तनाला दिशा देणाऱ्य त्यांच्या लेखणीत समाज घडविण्याचे सामर्थ्य होते.सुरुवातीला त्यांच्यावर कम्युनिस्टांचा प्रभाव होता पण पुढे कम्युनिस्टांचा फोलपणा लक्षात आल्यावर त्यांनी कम्युनिस्टांना सोडले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराकडे वळले."जग बदल घालून घाव सांगुन गेले मज भिमराव "या गीता द्वारे त्यांनी समाज जागृती केली.त्यांनी लाल बावटा हे कलापथक स्थापन केले. या लोक कलेतुन त्यांनी अनेक गीत लावण्या पोवाड्यांची बरसात केली. समाच प्रबोधनाचे काम केले.दिड दिवस शिक्षण घेणाऱ्या या महान साहित्य सम्राटाने मराठी भाषा जेवढी समृद्ध केली त्या मानाने नावारूपाला आलेले साहित्यिकही त्यांची उंची गाठू शकत नाही.खरं बघता मराठी भाषा दिवसाची नोंद या थोर सारस्वतांच्या नावावर व्हायला पाहिजे पण जिथे जात आडवी येते तिथे वंचितांच्या महानतेला डावलल्या जाते ही,या तथाकथित पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची शोकांतिका आहे आणि एक प्रकारचे लांक्षण आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये.माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतिया काहिली या लावणी ने त्यांना अजरामर केले आणि याच लावणी ने त्यांना मानाचा शेला देवुन शाहिरांच्या पंगतीत बसविले.स्वातंत्र्याच्या चळवळीत ही त्यांचा वाटा होता. १९४२मध्ये चळवळीत भाग घेतला म्हणून इंग्रजांनी त्यांना जेल मध्ये टाकले होते.१५आगष्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले पण हे स्वातंत्र्य नसुन सत्ता हस्तांतरण आहे असे म्हणुन "ये आजादी झूटी हैं, जनता सारी भूखी हैं"या घोषणेने १६आगष्ट१९४७ला मोर्चा द्वारे त्यांचा क्षोभ उसळला होता. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ,गोवा मुक्ती संग्राम आदी चळवळीत ते सहभागी झाले होते.त्यांच एकंदर आयुष्य म्हणजे एक झंझावात होता.विद्रोही विचाराचे अन्ना भाऊ साठे यांच्या विषयी सांगायला शब्द कमी पडतात म्हणून
“केवळ झालेत बहु होतील बहु, पण या सम हा “
अशा या झुंजार पण उपेक्षित कलम कार आणि धगधगत्या विचारांच्या निखाऱ्याला त्यांच्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन 💐💐🙏
एम एल गोपनारायण.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत