बौद्ध होणे म्हणजे माणूस म्हणून स्वतः ला विकसित करणे:- प्रबुद्ध साठे
पंढरपूर (पळशी) :– जातिव्यवस्थेच्या मानसिक गुलामीतून बाहेर पडणे, , अनिष्ट रूढी परंपरा अज्ञान, , अंधश्रद्धेच्या अंधारातून बाहेर पडून बौद्ध धम्माच्या मानवतावादी , विज्ञाननिष्ठ व परिवर्तनवादी प्रकाशाकडे चला, बौद्ध धम्म केवळ धार्मिकतेचा विषय नसून मानवी जीवनाचे कल्याण व सदाचाराचा मार्ग आहे, बौद्ध होणे म्हणजे माणूस म्हणून स्वतः ला विकसित करणे असे प्रतिपादन चला आपल्या बुध्दाच्या घरी अभियानाचे प्रमुख व भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध साठे यांनी केले, ते पंढरपूर तालुक्यातील पळशी येथील भोईटे वस्तीवर आयोजित बौद्ध धम्म दीक्षा समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते, राजू वाघमारे सर यांच्या पुढाकाराने मातंग, होलार, इत्यादी 51 बहुजन बांधवांनी बौद्ध धम्माचा स्वीकार, दीक्षा घेऊन घरवापसी केली, या क्रांतिकारी कार्यक्रमास धम्म जागृती मंचचे तानाजी साळवे सर, मोहन भोसले सर, जेष्ठ नेते भीमराव कांबळे, संतोष बनसोडे, अविनाश ताकतोडे, शहाजी ननवरे, अरुण कांबळे, दादासाहेब वाघमारे , पोपट मोरे , रामा मोरे आदी मान्यवर उपस्थित होते, प्रबुद्ध साठे आपल्या भाषणात पुढे म्हणाले,, नुसती रक्ताची, जातीची नाती असून चालत नाही तर माणुसकीच्या नात्याची भावना रक्तात असावी लागते, तरच माणसाचे जग सुखी होईल, यासाठी बौद्ध धम्माचा स्वीकार करावयाचा आहे, हे धर्मांतर मुळीच नाही , तर धम्मक्रांती आहे, आम्ही मुळचे बौद्धच आहोत, हजारो वर्षांनी आज स्वगृही परत घरवापसी केली आहे, यासाठी मी चला आपल्या बुध्दाच्या घरी अभियान चालवित आहे, कोणावर उपकार करण्यासाठी, कोणाच्या दावणीला बांधण्यासाठी, कोणाला चांगले वाटावे म्हणून किंवा कोणीतरी सांगते म्हणून नाही तर स्वतः बरोबरच कुटुंब समाज राष्ट्राचे कल्याण करणे या उदात्त भावना व विचाराने बौद्ध धम्माचा स्वीकार करावयाचा आहे, राजू वाघमारे व त्यांच्या संपूर्ण परिवाराने या सुंदर व क्रांतिकारी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत