आपल्या घटनात्मक हक्क आणि अधिकाराचे रक्षण करण्या करिता आत्ता कोणी महापुरुष येणार नाहीत ,,,,,,,!
ऍड अविनाश टी•काले , अकलूज
तालुका , माळशिरस , जिल्हा सोलापूर , मो न 9960178213
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो वर्षांचा अन्याय दूर करून मागासवर्गीय समाजाला विकासाची संधी देण्यासाठी शैक्षणिक , प्रशासकीय नौकरी , आणि जिथे कायदे बनतात त्या विधी मंडळात आरक्षणाची तरतूद घटनेच्या चौकटीत केली .
भारतात उच्च वर्णीय समाज मागास वर्गीय समाजाला न्याय देण्याच्या मानसिकतेत नाही हे त्यांना ज्ञात होते म्हणूनच त्यांनी स्वतंत्र मतदार संघाची मागणी तत्कालीन ब्रिटिश सरकार कडे केली .
परंतु अश्या प्रकारचे आरक्षण राहिल्यास समाज कायम दुभंगलेल्या स्थितीत राहील , म्हणून महात्मा गांधी यांनी येरवडा तुरुंगात प्राणांतिक उपोषण सुरू केले .
हिंदू मधील उच्च वर्णीय समाजाच्या विवेक बुध्दी वर व ते न्याय पूर्ण वर्तन करतील या आशा आधारे हा प्रश्न निकाली निघाला आणि संयुक्त मतदार संघाची निर्मिती पुणे कराराने अस्तित्वात आली .
भारतात हिंदू हिताची भाषा करणाऱ्या राजकीय पक्षाची वाढ होत असताना
फुले शाहू आंबेडकर आणि गांधी वाद याचे पांघरून घेतलेल्या तथा कथित “धर्म निरपेक्ष ” पक्षाची ही वृध्दी होत राहिली .
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांच्या मानवता वादी हक्का साठी , आर्थिक सामाजिक समानते साठी तत्कालीन हिंदू धर्मातील सनातनी वृत्ती विरोधात लढाई लढली .
याचा दाखला देऊन हा वर्ग कायम स्वरुपी भाजपा सारख्या पक्षाच्या विरोधात भूमिका घेत राहील व त्यातून आपल्या पारड्यात कायमची सत्ता राहील अशी दृष्ट रणनीती काँग्रेस व काँग्रेस चे पोटातून निर्माण झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षांनी कायम जोपासली .
आज माझे वय 60वर्षाचे झाले आहे
शरदचंद्र जी पवार साहेब यांचे भाषण सोलापूर मध्ये कॉलेज जीवनात वकीलीचे शिक्षण घेत असताना ऐकले , जेंव्हा ना छगन राव भुजबळ यांनी शिवसेना पक्ष सोडून काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता .
शिवसेनेत हेच भुजबळ साहेब असताना “रिडल्स” मोर्चातील आमचे समाज बांधव हुतात्मा स्मारक मध्ये अभिवादन साठी गेले म्हणून गो मूत्र आणि शेणाने ते पवित्र करणारे नेते होते , अचानक ते फुले वादी झाले आणि क्रांतिकारी भाषा बोलू लागले .
हे त्यांच्यातील परिवर्तन ही आम्ही पाहिले .
मनोहर जोशी यांच्या कार्यकाळात दलीत विद्यार्थ्यांना निळा गणवेश आणि इतरांना भगवा देण्याची घोषणा झाली तेंव्हा विधान सभेच्या हौद्यात उतरून हैदोस घालणारे पुरोगामी प्रा लक्ष्मण राव ढोबळे ही आम्ही पाहिले , आणि त्या नंतर भाजप मध्ये समाविष्ट झाल्या नंतर त्यांची बदललेली भाषा ही पाहिली ,
अनेकांना इकडून तिकडे व तिकडून इकडे जाताना येताना पाहत पाहत आमची राजकारणात वाटचाल चालू राहिली .
पवार साहेबांचे गारूड मनावर असल्याने आणि अकलूज चे आदरणीय विजयसिंह जी मोहिते पाटील साहेब हे पवार साहेबांचे जवळचे सहकारी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस हा आम्हाला कधीच परका वाटला नाही ,
अर्थात हा पक्ष लाडका असल्याने त्याचे प्रेमात आम्ही इतके अंध झालो की या पक्षाचे , त्यांच्या नेत्यांचे वर्तन कधी तपासावे असे ही वाटले नाही .
” साकी तुम मुझे “मय “(पाणी) पिला दे, या शराब,,,,,,
“मय भी पिता हुं तो आती हैं नशा शराब की “
अशी आमची अवस्था ,,
त्यातून एकदा महाराष्ट्र राज्य मागास वर्गीय सेल चे राज्य सचिव पदाची माळ आमच्या गळ्यात पडली .
सायकल ही हातात नसलेला मी एकमेव पदाधिकारी या पक्षाचा असेन
अर्थात फक्त हे पद शोभेचे होते आणि
घरात नाही दाना मला हवालदार म्हणा
अशी आमची स्थिती असताना ही , पक्षाकडे कोणतीही अपेक्षा न करता
राजकीय आवडी मुळे वकिली क्षेत्र ही सोडून दिलेले असल्याने पत्रकारिता , ते दैनिक महापर्व संपादक म्हणून लेखणीच्या आधारे कुटुंब आणि स्वतः ची उपजीविका करत राहिलो .
2009साली कै आ हनुमंत राव डोळस यांच्या प्रचारा साठी माळशिरस तालुक्यात कार्यकर्ते ही नसताना , जे आदरणीय विजय दादा यांच्या प्रचारासाठी पंढरपूर मंगळवेढा भागात गेले असल्याने वक्तृत्वा चां सर्व भार खांद्यावर घेऊन फुफुसाला सूज येई पर्यंत भाषणे करत गेलो .
आणि हा विजय खेचून आणला .
पण त्याची कदर कधीच पक्षाने केली नाही .
महा विकास आघाडी आणि महा युतीत सत्ता स्पर्धा असताना आम्ही पद पैसा प्रतिष्ठा याची अपेक्षा न करता व्हॉट्सॲप वरील लिखाण , युट्यूब वरील महा विकास आघाडी ची भूमिका मांडण्याचे केलेले काम आणि अकलूज मधील सर्व कॉर्नर बैठका व जाहीर सभा , यात भूमिका मांडून आमचा सहभाग नोंदवला
खा धैर्यशील जी मोहिते पाटील यांच्या विजयात आमचा खारीचा का होईना वाटा आहे हे त्यांना मान्यच करावे लागेल .
या सर्व राजकीय वाटचालीचे फलीत आमच्या व आमच्या सारख्या दलीत कार्यकर्त्यांच्या वाट्याला काय मिळाले?
याचे परीक्षण करताना आम्ही मुळा पासून हादरून गेलो .
“सामाजिक समरसता” सोडून सामाजिक राजकीय समता वादी म्हणून ज्या पक्षासाठी आम्ही आमचे आयुष्य वेचले तो पक्ष हा फसवा असून त्यांना आमच्या विकासाचे , सामाजिक न्यायाचे कांहीं ही देणे घेणे नाही हेच लक्षात आले”
2018साली उत्तमराव जानकर आणि आ गोपीचंद पडळकर यांनी एकत्रित येत धनगर आरक्षण लढाईची सुरुवात केली
माझे कामच लेखणी असल्याने व त्या समवेत एक लढाई उभा करता येते म्हणून अखेरचा लढा
यातील सर्व लिखाणाची बाजू मी सांभाळली , अनेक पोवाडे , अखेरचा लढा शॉर्ट फिल्म लिखाण आणि त्यातील भूमिका ही केली .
“धूमस”चित्रपट मुख्य कथा , त्यातील गाणी ही लिहिली , पण या कामाचे मूल्य म्हणून मला फक्त कोटी दोन कोटींची आश्वासने मिळाली
सर्व अधिकार नावा सहित सोडण्याचे त्यांचे प्रपोजल मी धुडकावून लावले याचे कारण शब्दाशी प्रामाणिक राहण्याचा त्यांचा इतिहास नाही व नव्हता
चित्रपट प्रदर्शित झाला पण त्यास वितरक न मिळाल्याने तो डब्यात पडून राहिला ,
मानवीय साधी इमानदारी अस्तित्वात असती तर किमान 25लाख तरी त्यांनी दिले असते , पण ते देण्याची दानत नसलेले आज सहकार्याची भाषा बोलत आहेत
असो आपला मुद्दा हा नाहीच ,,
मोहिते पाटील यांनी लोकसभेतील तिकीट वाटप प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस सोडली आणि भाजपा जॉईन केली .
मोहिते पाटील यांच्या विरोधाचा विचार न करता आम्ही पक्षाशी इमान ठेवले
कोणतेही संयुक्तिक कारण नसताना उत्तम राव जानकर यांनी भाजपा समवेत जाण्याचा निर्णय घेतला
माळशिरस तालुक्यात अस्तित्व शून्य झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस ची धुगधुगी
शंकर नाना देशमुख, प्रकाश बापू पाटील , माणिक बापू वाघमोडे
इत्यादी नी चालू ठेवली , आमच्या सहित अनेकांनी हा किल्ला एकाकी लढवला आणि किमान 40,000मते पक्षाला मिळाली.
पुढे विधानसभेत आ राम सातपुते यांना भाजपने उमेदवारी दिली
भीमा कोरे गाव चां संघर्ष ध्यानात घेऊन आम्ही उत्तमराव जानकर यांची उमेदवारी मान्य केली
ना अजित दादा यांनी आम्हाला मुलाखत घेताना सांगितले की निवडणुका लढवण्यासाठी किमान कांहीं कोटी रुपये आणि कार्यकर्त्यांचा संच लागतो , मोहिते पाटील यांच्या शी टक्कर घेऊ शकेल असा दुसरा ग्रुप फक्त उत्तम राव जानकर यांच्या रूपाने अस्तित्वात आहे
आम्ही त्यांचे म्हणणे मान्य केले ,
दलीत , मागासवर्गीय समाजातील कार्यकर्त्याला कसल्याच विकासाच्या संध्या द्यायच्या नाहीत ,कॉन्ट्रॅक्ट द्यायची नाहीत , जिल्हा नियोजन मंडळा वर ही घ्यायचे नाही , त्यांच्या शेतीला बँकांनी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेने ही कर्ज द्यायची नाहीत , त्यांना विकास सोसायटीत सभासद म्हणून घ्यायचे नाही ,
त्यांचा विकास काय घंटा होणार ?
ज्यांना दैवत आणि पुरोगामी नेते म्हणून आम्ही पूजायचे त्यांनी अर्थकारणाची भीती दाखवून आमच्या संसदीय वाटा बंद करायच्या
या जगात कोणी कोणाला फुकट कांहीं देत नाही , आपण आपल्या अधिकारावर अतिक्रमण केले जात असताना शांत राहिलो म्हणून
फलटण , माळशिरस , मोहोळ, सोलापूर, आणि अजून किती तरी ठिकाणी तुलनेने कमी लोकसंख्या ची , व जात पायरी ने जरा उच्च असलेल्या लोकांना उमेदवारी देत राहिले
या राजकीय आरक्षणाचा फायदाच नवबौध्द व मातंग समाजाला होणार नसेल व तो होऊ नये म्हणून राजकीय पक्ष आपल्या चाली खेळत असतील तर त्या पक्षांना काडी च लावलेली बरी
स्वातंत्र्या पासून 75वर्ष ज्या नवबौध्द व मातंग समाजाने तुम्हाला पिढ्या न पिढ्या मतदान केले , तुम्हास आपले मानले,
वाढपी म्हणून तुमच्या हातात पळी असताना तीन तीन टर्म उलटून ही तुम्हाला आमची आठवण होत नाही काय?
तुमच्या उष्टावळया उचलणे एवढेच आमचे काम आहे काय?
म्हणूनच,,,,
“ज्यांना आमची एलर्जी त्यांची आम्हाला शिसारी”
ही भूमिका घेऊन समग्र महाराष्ट्रातील नवबौध्द व मातंग समाजातील जनतेला आवाहन करत आहे की “
“काय भुलला शी वरलिया सोंगा”
तसे या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला भुलू नका ,,
आपले एक ही मत इकडे तिकडे न वाया घालवता या पक्षाच्या विरोधात जो पक्ष स्ट्रॉंग असेल मग तो भाजपा का असेना त्याला मते द्या
अर्थात त्यांनी ही आपल्याला राखीव जागेवर प्रयाप्त न्याय दिला तरच”
जयभीम ,,,,,,! जय अण्णा भाऊ,,,,,!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत