महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

ओबीसी बांधवांनो पुन्हा चुक करु नका…!!

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी १९५० ला ३४० वे कलम लिहून ओबीसींच्या आरक्षणाची तरतूद केली. १९५० ते १९९० तब्बल चाळीस वर्षे ओबीसी बांधवांना त्यांचा संवैधानिक हक्क आणि अधिकार सत्ताधारी मनुवादी कॉंग्रेस पक्षाच्या भेदभावपूर्ण नीतीमुळे मिळाला नाही. चाळीस वर्षांत किती पिढ्या आणि किती ओबीसी तरुणांची संधी हिसकावून घेतल्या गेली.?
देशातील ओबीसी समुहाची लोकसंख्या बघता लाखो, करोडो तरुणांचे शिक्षण, नोकरी, पदोन्नती आणि राजकीय लाभाचे अपहरण झाले. ही हानी भरून निघणारी नाही. अर्थातच ओबीसींचे शिक्षणविषयक, नोकरी,पदोन्नती, आर्थिक आणि राजकीय लाभ सवर्णांनी हळप केले आणि म्हणून ओबीसी सवर्णांच्या तुलनेत शिक्षण,नोकरी, आर्थिक आणि राजकीय पातळीवर मागे पडला हे वास्तव आहे….!!
१९८० ते १९९० च्या दशकात ओबीसी आरक्षणासाठी अर्थात मंडल आयोग लागू करावा म्हणून आंबेडकरी संघटना आणि आंबेडकरी नेतृत्व रस्त्यावर येऊन लढा लढतं होते. मोर्चे काढतं होते त्यावेळी ओबीसी तरुण आणि सामान्य ओबीसी बांधव शिवसेना आणि भाजप च्या धार्मिक उन्मादात मशगुल होता. ओबीसी समुहाचे महाराष्ट्रातील नेतृत्व छगन भुजबळ शिवसेनेत कट्टर हिंदूत्ववादी भुमिका घेऊन लढतं होते तर स्व. गोपीनाथ मुंडे साहेब भाजपची हिंदुत्ववादी भुमिका ओबीसी समुहाच्या ग्रामीण भागात घराघरात पोहचवतं होते.आणि ओबीसी तरुण बांधवांना स्वतः च्या उज्वल भविष्य आणि सर्वांगीण हितापेक्षा हिंदूत्व मोठे आणि अस्मितेचे वाटतं होते हेही वास्तव आहे…!!
मंडल आयोग व्ही. पी. सिंह यांच्या सरकार कडून लागू करून घेण्यात अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली हा इतिहास समजून घ्या. ओबीसी बांधवांच्या उज्वल भवितव्याचा मंडल आयोग आंबेडकरी नेतृत्वाच्या पुढाकाराने लागू झाला ही वस्तुस्थिती लक्षात घ्या.मंडल आयोग लागू करण्यासाठी कोणता ओबीसी किंवा हिंदुत्ववादी नेता लढाई लढला ते तपासून बघा.शोधून एकही सापडतं नाही….!!
१९९० पासून मंडल आयोग लागू झाल्यामुळे किती तरुणांना शैक्षणिक सुविधा, नोकरी, नोकरदार वर्गाला पदोन्नती, आर्थिक लाभ आणि राजकीय आरक्षण मिळाले तो आकडा खूप मोठा आहे…!!
ओबीसी समुहाचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी मंडल आयोग ही एक अनमोल संधी सिद्ध झाली आहे…!!
ही अनमोल संधी पहिल्या दिवसापासून सवर्णांच्या डोळ्यात खुपतेय हेही ओबीसी समुहाने समजून घेतले पाहिजे. मंडल आयोग लागू झाल्यापासूनचा इतिहास असे सांगतो की, मंडल आयोगाच्या विरोधात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, आणि सवर्णांच्या सगळ्या उजव्या संघटनांनी देशभर उग्र धरणे आंदोलन केले, त्याला भाजप आणि कॉंग्रेस मधील सर्वच सवर्णांची आतून साथ होती. दिल्लीच्या रस्त्यावर उतरून तरुण मुलांना जाळणे अशाप्रकारचा टोकाचा विरोध सवर्णांनी मंडल आयोगाला केला….!!
एका बाजूला भाजपच्या लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या अशी राममंदिरा साठी रथ यात्रा काढून ओबीसी तरुणांना आणि भोळ्या बांधवांना धर्माची नशा चढविण्यात आली तर दुसऱ्या बाजूने मंडल आयोगाला कोर्टात आव्हान देऊन इंदिरा साहनी केस. क्रिमिलेअरची अट, ५०% पेक्षा जास्त आरक्षण नसावे असा न्यायालयीन शेरा आणि वेळोवेळी ओबीसी आरक्षणाचा कमी होतं जाणारा टक्का म्हणजे ओबीसी समुहाच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करण्याची कपटनिती सवर्णांनी आखली होती हेही ओबीसी समुहाने समजून घेतले पाहिजे….!!
आता पुन्हा ओबीसी आरक्षण संपवण्याचे षडयंत्र रचल्या जाते आहे. म्हणजे ओबीसी समुहाच्या अस्मितेवर घाला घालण्याचा हा कपटी मनसुबा आहे…!!
राजकीय पक्ष म्हणून महाराष्ट्रात भाजप,कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात कोणतीच भुमिका घ्यायला तयार नाहीत. गावागावात तनाव आहे. मनामनात असंतोष धुमसत आहे. जातीय धृर्वीकरणाचा सत्ता मिळविण्यासाठी ज्यांना फायदा होतो ते राजकीय पुढारी मुग गिळून बसले आहेत, संधीची वाट बघत आहेत….!!
अशा स्फोटक परिस्थिती मध्ये एकही ओबीसी नेता आपला राजकीय पक्ष बाजूला ठेऊन सामाजिक बांधिलकी म्हणून आरक्षणाच्या संदर्भात रोखठोक भुमिका घेतांना दिसतं नाही. ही उदासीनता जीवघेणी आहे. हा नाकर्तेपणा म्हणजे ओबीसी समुहाच्या पुढील पिढ्यांसाठी घातक आहे….!!
ओबीसी बांधवांनो सत्ता आणि सत्तेच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक बदलासाठी कार्य करणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी २५ जुलै पासून मुंबई च्या चैत्यभूमीवरुन ” आरक्षण बचाव यात्रा ” सुरू केली आहे…!!
आम्हाला कुठल्याही परिस्थितीत आरक्षण वाचवायचेच आहे हा संदेश द्यायचा असेल आणि सवर्णांच्या षडयंत्राला सडेतोड उत्तर द्यायचे असेल तर महाराष्ट्रातील ही “आरक्षण बचाव यात्रा ” मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली पाहिजे….!!
कुठल्याही धर्मवादी, जातीयवादी आणि षडयंत्रकारी सवर्णांच्या अफवांना भुलथापांना बळी न पडता ओबीसी समुह आरक्षण बचाव यात्रेत सहभागी झाला आणि रस्त्यावर उतरला तर आरक्षण वाचविण्याच्या लढ्याला बळ मिळेल…!!
१९८०-९० च्या दशकात धर्मवादी सवर्णांच्या नादाला लागून ओबीसी समुहाच्या हक्काचा मंडल आयोग ओबीसींनी समजून घेतला नाही. त्या आंदोलनात ओबीसी समुहाने सहभाग नोंदवला नाही. ती लढाई आंबेडकरवादी लढले.तशाच प्रकारची चुक पुन्हा करु नका. आरक्षण बचाव यात्रा यशस्वी करा आणि आरक्षणाचा लढा आम्ही निकराने लढतोय असा संदेश द्या….!!
जयभीम.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!