मुख्यमंत्री लाडकी बहीण याेजनेसाठी राज्यातुन तब्बल ७२ लाखापेक्षा आधिक अर्ज
पुणे : राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांकडून टीका केली जात असताना या टीकेला महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी बारामतीतून उत्तर दिलंय.
लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत ७२ लाखांपेक्षा जास्त अर्ज करण्यात असल्याचे सांगत या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी, सर्वर डाऊनची अडचण, महिलांकडून फॉर्म भरून घेताना घेतले जाणारे पैसे, यावरून विरोधकांकडून टीका केली जात आहे.
या टीकेला मंत्री अदिती तटकरे यांनी जोरदार उत्तर दिले आहे.
राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत आहे.
ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने महिलांकडून फॉर्म भरुन घेतले जात आहेत.
यात नारीशक्ती दूत ॲपवरुन, पोर्टलवरुन,
सेतू कार्यालय, अंगणवाडी सेविका आणि महिला व बाल कल्याण विभागातही महिलांकडून या योजनेसाठी अर्जांची पूर्तता केली जात आहे.
दरम्यान, विरोधकांच्या टीकेला उत्तर देत त्यांनी विरोधकांना चांगलच सुनावलंय.
लाडकी बहीण योजनेसाठी रोज ८ ते १० लाख अर्ज
लाडकी बहीण योजनेसाठी रोज ८ ते १० लाख अर्ज येत असून आत्तापर्यंत ७२ लाखांपेक्षा जास्त अर्जांची नोंदणी झाली आहे,
असे सांगत अदिती तटकरे यांनी विरोधकांवर जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.
त्या म्हणाल्या, विरोधक पहिला दिवसांपासूनच या योजनेसंदर्भात टीका करत आहेत.
मात्र मला आवर्जून सांगायचे आहे की, या योजनेला सर्वात जास्त प्रतिसाद मिळत आहे.
आमच्यासाठी ही गोष्ट समाधानकारक आहे.
जे टीका करत आहेत.ते त्यांच्या मतदार संघात त्यांचे बॅनर लावून कॅम्प आयोजित करत आहेत.
त्यामुळे महायुती सरकारने आणलेली ही योजना माता भगिनींसाठी किती उपयुक्त आहे.
प्रत्येक लोकप्रतिनिधींना माहिती आहे.
त्यामुळे एका बाजूला टीका करायची आणि दुसऱ्या बाजूला कॅम्प आयोजित करायचे. आणि वेगळे बॅनर लावून दिशाभूल करायची.
अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत