भारतात टॅक्सपेयर-कर दाता असणं हा गुन्हा आहे का?
सौरभ कोरटकर
सर्वसामान्यांच्या कष्टाच्या पैशांची कत्तल कोण करतंय?
- एखाद्याचं उत्पन्न ३ ते ७ लाखांपर्यंत असेल तर ५ टक्के
- ७ ते १० असेल तर १० टक्के, १० ते १२ असेल तर १५ टक्के
- १२ ते १५ असेल तर २० टक्के,
- १५ लाखाहून अधिक असेल तर ३० टक्के
- यातून पैसे उरल्यावर गाडी घेताना 30%
- गाडी चालवताना कमीत कमी २००० रुपयांचा टोल
- रोजच्या सामान खरेदीत 5 – १५ % जीएसटी
- इलेक्ट्रिसिटी बिल वर १८ % कर
- मोबाईल रिचार्जवर १८ % कर
- धान्यावर ५ % कर
- पेट्रोल आणि डिझेलवर 20 टक्क्यांच्या आसपास टॅक्स
- कुठल्याही इलेक्ट्रिक वस्तूवर १८-28 % टॅक्स
- हॉस्पिटलमध्ये गेल्यावर ५ %
- औषध गोळ्यांवर १२ % कर
- हेल्थ इन्शुरन्स, पॉलिसीवर 18 %
या सगळ्यातून पैसे वाचले आणि तुम्ही ते
- म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले तर STCG २० %
- दिर्घकाळ ठेवले तर LTCG १२.५ %
ज्या पैशांवर तुम्ही ऑलरेडी टॅक्स दिलाय त्याच पैशातून
- तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले तर तिथेही STCG २० %
- लाँग टर्म ठेऊन मग शेअर्स विकले तर १२.५ % टॅक्स
- सेक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स ०.०६२५ %
- शेअर्स घेतल्यावर आलेल्या डिव्हीडंडवर १० %
म्हणजे रिस्क आपली, पैसे आपले पण कमावणार सरकार
या सगळ्या चक्रातून पैसे वाचवून
- तुम्ही घर घेता तेव्हा 1 ते ५ % टॅक्स, स्टॅम्प ड्युटी
- त्यानंतर 10 रुपये स्क्वेअर फुट प्रमाणे प्रॉपर्टी टॅक्स
- त्यानंतर घर विकताना त्यावर परत १२.५ टक्के टॅक्स
म्हणजे आपण दिवस रात्र मेहनत करायची, पोटाला चिमटे काढायचे.. शक्य होईल तिते पैसे वाचवायचे.. आणि ते सरकारच्या तिजोरीत जमा करायचे.. त्या पैशात सरकार आपल्याला काय देतं..
ना चांगले रस्ते.. ना आरोग्य सुविधा… ना पायाभुत सुविधा… ना चांगलं शिक्षण….. ना चांगलं स्वच्छ वातावरण…. ना चांगली वाहतूक व्यवस्था… मग घाम गाळून कमावलेला हा इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारला का म्हणून द्यायचा…?
-तर ८० कोटी लोकांना फुकट अन्नधान्य देण्यासाठी
-अतिक्रमण करुन झोपडपट्टी बांधणाऱ्यांना फुकट घरं देण्यासाठी
-लाडकी बहिण म्हणत लोकांना पैसे फुकट वाटण्यासाठी
-वेगवेगळ्या सबसिडी, सिलेंडर देण्यासाठी
-वेगवेगळ्या सुविधा वस्तु काही जणांना फुकट देण्यासाठी..
ज्या रेवडी कल्चरवर टीका मोदींनी टीका केली आज तेच मोदी रेवडी वाटल्यासारख्या योजना वाटतायत… इतकी वर्ष मध्यमवर्गींय करदात्यांची मतं मिळवली आज त्यांनाच लुटण्याचं काम मोदी सरकार करतंय….
ज्या मध्यमवर्गींयांनी मोदींना डोक्यावर चढवलं त्यांची खिशासकट चड्डी ओढायचं काम सरकार व्यवस्थित करतंय..
यामुळे देशात काळा पैसा आणखी वाढेल आणि टॅक्स वाचवण्याचे गैरप्रकार सुद्धा…
- सौरभ कोरटकर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत