राहुल गायकवाड यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान
राजर्षी शाहू महाराज जयंती कार्यक्रमाचे औचित्य साधून राजर्षी शाहू महाराज “आदर्श शिक्षक पुरस्कार” व “समाज भूषण “पुरस्काराचे वितरण डॉ . बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समिती पुणे जिल्हा यांच्यावतीने कस्तुरी लाॅंन्स उरुळी कांचन येथे करण्यात आले.
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हे पुरस्कार वितरित केले जातात.समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या समितीच्यावतीने सन्मान करण्यात येतो. जिल्हा परिषद शाळा शिवापूर शाळेतील पदवीधर शिक्षक आणि महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब महासंघाचे हवेली तालुका अध्यक्ष आयु. राहुल शिलामण गायकवाड यांना “समाज भूषण” पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा पुरस्कार यशदा व बार्टीचे मा. संचालक श्री. रविंद्र चव्हाण, महिला व बालकल्याण उपायुक्त महाराष्ट्र शासन मा. श्री. राहुल मोरे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.भिमराव धिवार तसेच संस्थेचे पदाधिकारी, उरुळी कांचन गावचे सरपंच श्री. कांचन ,शिक्षक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत